यशश्री अपडेट्स-धाराशिव(प्रतिनिधी)दि.२९ मे? महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ निवडणुकीसाठी उस्मानाबाद – लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आतापर्यंत ३२ व्यक्तींनी ६० कोरे नामनिर्देशनपत्रे प्राप्त केली आहेत. तर दोन उमेदवारांकडून नामनिर्देशनपत्र दाखल करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.
भारत निवडणूक आयोगाने १८ मे २०२६ रोजी महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे.त्यानुसार उस्मानाबाद-लातूर-बीड स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाची निवडणूक सूचना २५ मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आली.
२५ मे २०२६ पासून आजअखेर ३२ व्यक्तींनी जिल्हाधिकारी कार्यालयातून एकूण ६० कोरे नामनिर्देशनपत्रे घेतली आहेत.तसेच आजपर्यंत दोन उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले आहेत.
दरम्यान,या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी आता केवळ दोन दिवसांचा कालावधी शिल्लक राहिला आहे. शनिवार,३० मे २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत तसेच सोमवार,१ जून २०२६ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत.निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी धाराशिव यांच्या कार्यालयात ही प्रक्रिया पार पडणार असल्याचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी विदयाचरण कडवकर यांनी कळविले आहे.
*
