यशश्री अपडेट्स बार्शी(प्रतिनिधी) :
बार्शी दिनांक २५/०५/२६ रोजी सकाळी १०:१५ वाजणाचे सुमारास महिला धनश्री ऋषीकेश पाटील ही बचट गटाचे काम करुन लक्ष्याचीवाडी गावाकडुन परत बार्शीचे दिशेने ज्युपीटर गाडी नं. MH१३ FA ४०१६ यावरुन परत येत असताना बार्शी – परांडा रोडवरील प्रविण हॉटेलजवळ आली असताना आरोपी ऋषीकेश संभाजी पाटील रा. नागणे प्लॉट, परांडा रोड, बार्शी
ता. बार्शी जिल्हा सोलापुर याने तिला थांबवुन तिच्या चारित्र्यावर संशय घेवुन त्याने त्याचे जवळील धारदार हत्याराने तिचे गळयावर, मानेवर, पोटावर वार करुन गंभीर जखमी केले असल्याची माहीती प्राप्त होताच तात्काळ सहा.पो.नि. महेश माने व पथकाने घटनास्थळी जाऊन जखमीला उपचारार्थ ग्रामीण रुग्णालय, बार्शी येथे पाठविण्यात आले. सदर गुन्ह्यातील आरोपी याचा शोध घेणेकामी २ पथके तयार करून रवाना करण्यात आले. यातील जखमी हिस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता
वैद्यकीय अधिकारी यांनी ती उपचारापूर्वीच मयत झालेचे घोषीत केले. त्यानंतर सदर बाबत फिर्यादी जितेंद्र विश्वनाथ गायकवाड
वय- ५६ वर्षे जात- मराठा धंदा- शेती रा. कासारवाडी ता. बार्शी यांनी तक्रार दिल्याने सदर बाबत बार्शी तालुका पोलीस ठाणेस
गु.र.नं १५१/२०२६ BNS कलम १०३ (१ ) प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासामध्ये यातील आरोपी यास तात्काळ ताब्यात घेवून त्याचेकडे विचारपूस करून त्यास अटक करून त्याचेकडे गुन्ह्यातील हत्यार बाबत तपसा केला असता त्याने सदरचे हत्यार हे एका ठिकाणी लपवून ठेवले बाबत माहीती दिल्याने सदरचे हत्यार हे दोन पंचासमक्ष फिंगरप्रींट पथक, डॉग स्कॉड पथक मदतीने व फॉरेन्सिक पथक यांचे वैज्ञानिक पद्धतीने जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्ह्याचा तपास सहा. पोलीस निरीक्षक महेश माने हे करीत असून गुन्ह्याचा अधिक तपास चालू आहे.
सदरची कामगीरी मा. पोलीस अधीक्षक अतूल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सह पोलीस अधिक्षक अंजना कृष्णा, पो.नि. संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा सोलापूर ग्रामीण, पो. नि. बालाजी कुकडे
बार्शी शहर पोलीस ठाणे यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी सहा. पो. नि. महेश माने,
पो. उपनिरीक्ष बालाजी वळसने, पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भालेराव, पोसई चंद्रकांत घोळवे, एएसआय सदाशिव
गवळी, पोहेकॉ / ३७३ राजेंद्र मंगरूळे, पोहेकॉ / १७४७ धनराज केकाण, पोहेकॉ / १६३२ अभय उंदरे, पोहेकॉ / ७५० सुभाष
सुरवसे, महिला पोहेकॉ / ४३२ स्वाती काटे, पोकॉ/३५८ बालाजी हांगे, पोकॉ/११३० लोंढे, पोहेकॉ / १७५ खांडेकर, पोहेकॉ / १५७५ दशरथ बोबडे, पोहेकॉ / १६४६ अमित घाडगे, पोकॉ/७४७ राहूल बोंदर, पोकॉ/१२१९ नगानाथ आंधळे, पोकॉ/१०२७ सुरेश बिरकले, पोकॉ/ १९९७ ओमप्रकाश दासरे, पोकॉ / १०९९ गोविंद बचुटे, पोकॉ/ २४ शिवशंकर खराडे यांनी केली आहे…


