उद्योजक घडविणाऱ्या पालकांचा गौरव;भगवान बाबुराव पवार व शालन पवार पुरस्काराने सन्मानित

यशश्री अपडेट्स -परांडा प्रतिनिधी | दि. २५ मे २०२६

मराठवाडा मित्रपरिवार, पुणे यांच्या वतीने आयोजित “यशस्वी उद्योजकांच्या आई-वडिलांचा गौरव सोहळा” मोठ्या उत्साहात पुणे येथील एमआयटी सभागृहात संपन्न झाला. या सोहळ्यात परंडा तालुक्यातील यशस्वी उद्योजक रामभाऊ पवार यांच्या आई-वडिलांचा विशेष सन्मान करण्यात आला.

भगवान बाबुराव पवार व शालन भगवान पवार यांना “माता-पिता पुरस्कार” प्रदान करून गौरविण्यात आले. हा पुरस्कार खासदार छत्रपती संभाजी राजे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागातील प्रतिकूल परिस्थितीत कष्ट, जिद्द आणि संस्कारांच्या जोरावर मुलांना घडवून समाजासमोर आदर्श निर्माण केल्याबद्दल पवार दांपत्याचा गौरव करण्यात आला. या वेळी उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या संघर्षमय प्रवासाचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमास पवार कुटुंबीय, नातेवाईक, मित्रपरिवार तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण सभागृहात टाळ्यांच्या गजरात पवार दांपत्याचा सन्मान करण्यात आला.

या सन्मानामुळे पवार कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून परिसरातून आनंद व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!