धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेला आजपासून सुरुवात!

यशश्री अपडेट्स- धाराशिव (प्रतिनिधी )

*२५ मे ते १ जून नामनिर्देशन प्रक्रिया*

धाराशिवः धाराशिव- लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची अधिसूचना सोमवारी (दि. २५) प्रसिद्ध होणार असून याच दिवशी नामनिर्देशन प्रक्रियेस प्रारंभ होणार आहे. अर्ज दाखल करण्यासाठ १ जून रोजी अंतिम मुदत राहणार आहे. मतदान १८ जून रोजी तर निवडणुकीचा फैसला अर्थात मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत विविध राजकीय पक्षांची भूमिका काय राहणार ? कोणकोणते उमेदवार निवडणूक आखाड्यात उतरणार व आगामी काळात कोणत्या राजकीय घडामोडी घडणार? याकडेच नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

धाराशिव- लातूर – बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या प्रक्रीयेस सोमवारी प्रारंभ होणार आहे. सोमवारी नामनिर्देशन प्रक्रीयेस प्रारंभ होणार आहे. धाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार हे निवडणूक निर्णय अधिकारी तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून विद्याचरण कडवकर धाराशिव, केशव नेटके लातूर व शिवकुमार स्वामी बीड हे या निवडणुकीचे कामकाज पाहत आहेत. धाराशिव येथील जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांचा कक्ष सुरू करण्यात आला असून याच ठिकाणी ऑफलाईन पद्धतीने अर्ज स्विकारले जाणार आहेत. २५ मे ते १ जून या कालावधीत नामनिर्देशन प्रक्रीया होणार आहे. २ जून रोजी अर्जाची छाननी तर अर्ज मागे घेण्यासाठी ४ जून रोजी अंतिम मुदत आहे. निवडणुकीचा फैसला अर्थात मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे. धाराशिव लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीची नामनिर्देशन प्रक्रीया सोमवारपासून सुरू होणार असल्याने या निवडणुकीत कोणत्या राजकीय पक्षाकडून कोण उमेदवारी अर्ज दाखल करणार व कोणकोणत्या राजकीय घडामोडी घडणार? याकडेच नागरिकांचे लक्ष वेधले आहे.

*मतदार यादीवर बुधवारपर्यंत आक्षेप सादर करता येणार !*


धाराशिव – लातूर- बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने निवडणूक विभागाकडून प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदार यादी संदर्भात २७ मे पर्यंत आक्षेप दाखल करता येणार आहेत. निवडणूक विभागाकडून आलेले आक्षेप निकाली काढून १ जून रोजी अंतिम प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक विभागातील सुत्रांनी सांगितली

*धाराशिव ३१७, लातूर ३६७ व बीड ३०४  मतदार  एकूण ९८८ मतदार आपला मतदानाचा हक्क…*

धाराशिव जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे ५५ सदस्य, ८ पंचायत समितीचे ८ सभापती, ८ नगर परिषद व २ नगरपंचायतचे नगराध्यक्ष व सदस्य २५४ असे एकूण ३१७ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीवर प्रशासकराज असल्याने ११ नगर परिषद / नगर पंचायतचे अध्यक्ष व सदस्य असे एकूण ३०४ मतदारच या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदचे ५९ सदस्य व १० पंचायत समितीचे सभापती, एका महानगर पालिकेचे एकूण २२१ सदस्य असे ३६७ मतदार या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

*धाराशिव-लातूर- बीड या स्थानिक स्वराज्य संस्था या ठिकाणी होणार मतदान *
लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी निवडणूक विभागाकडून एकूण २९ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये बीड ११, लातूर १० तर धाराशिव जिल्ह्यात ८ अशा एकूण २९ केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात तालुकास्तरावर तहसील कार्यालयात मतदान केंद्र उभारण्याचे नियोजन करण्यात आल्याची माहिती निवडणूक विभागातील सुत्रांनी सांगितली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *