प्रा. लांडगे यांना अर्थशास्त्र विषयात पीएचडी प्रदान

यशश्री अपडेट्स प्रतिनिधी परंडाः शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे. शिंदे महाविद्यालय येथील अर्थशास्त्र विभागाचे प्रा. कृष्णा लांडगे यांना सोलापूर येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाने पीएचडी प्रदान केली आहे. विद्यापीठाच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यावाचस्पती (पीएचडी) पदवीच्या मौखिक परीक्षेमध्ये लांडगे यांनी अर्थशास्त्र विषयात यश

संपादन केले. त्यांनी ‘खवा उत्पादकांच्या आर्थिक व सामाजिक स्थितीचा अभ्यास : विशेष संदर्भ धाराशिव जिल्हा’ या विषयावर आपले संशोधन पूर्ण केले. त्यांना डॉ. आर. पी. ढवण यांचे मार्गदर्शन लाभले.

Leave a Reply

error: Content is protected !!