यशश्री अपडेट्स -धाराशिव –
०४ आरोपी व ८,३८,५०० रूपयांचा मुददेमाल पोलीसांचे ताब्यात..दि ०१.०५.२०२६ रोजी पोस्टे तुळजापूर हददीत तुळजाभवानी मंदीरात भाविक महिलेच्या गळयातील गंठण चोरी केल्यावरून पोस्टे तुळजापूर गुरनं २१०/२०२६ क ३०३ (२) भान्यांसं अन्वये अनोळखी महिलांविरुदध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशाच प्रकारे काही गुन्हे धाराशिव गुन्हे अभिलेखावर नोंद असल्याने व सदरचे गुन्हे अतिसंवेदनशील व गंभीर स्वरूपाचे असल्याने मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक, धाराशिव यांनी असे गुन्हे तात्काळ उघडकीस आणण्याबाबत स्थानिक गुन्हे शाखा, धाराशिव यांना आदेशित केले होते. दि १५.०५.२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे सपोनि कासार व पथक यांनी गोपनीय बातमीदार यांचेकडून प्राप्त माहितीवरून पारगाव टोल नाका, वाशी येथून ०२ संशयित महिला व ०२ पुरुषांना त्यांचे स्कॉर्पियो वाहनासह शिताफीने ताब्यात घेतले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे चौकशी केली असता त्यांनी त्यांचे अन्य साथीदारांचे सोबत मिळून तुळजापूर व येरमाळा येथे भाविक महिलांचे गळ्यातील गंठण/मणिमंगळसुत्र चोरी असल्याचे कबूल केले. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडून एकूण २७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने व गुन्हयात वापरलेली महिंद्रा स्कॉर्पियो असा एकूण ८,३८,५०० रूपयांचा मुददेमाल ताब्यात घेण्यात आला आहे. नमुद आरोपींकडून चोरीचे पोस्टे तुळजापूर येथील दाखल ०१ व पोस्टे येरमाळा येथे दाखल ०३ असे एकूण ०४ चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत.अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे १) अनिता सुनिल शिंदे २) हिराबाई रमेश शिंदे, ३) चिरंजीव रमेश शिंदे ४) किरण शेषेराव शिंदे सर्व रा, पिंपळगाव तांडा, ता अंबड जि जालना, अशी असून नमुद आरोपी व जप्त मुददेमाल पुढील कारवाईस्तव पोस्टे येरमाळा यांचे ताब्यात देण्यात आले आहे. सदरची कामगिरी मा. श्रीमती रितू खोखर, पोलीस अधिक्षक धाराशिव व शफकत आमना, अपर पोलीस अधिक्षक धाराशिव यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि विनोद इज्जपवार, सपोनि सुदर्शन कासार, पोह शौकत पठाण, पोह जावेद काझी, पोह फरहान पठाण, मपोह शोभा बांगर, मपोकॉ बहिरवाड (पोस्टे वाशी) चापोह रत्नदिप डोंगरे, नागनाथ गुरव यांचे पथकाने केली आहे.
