यशश्री अपडेट्स | परंडा
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी शहर व तालुका परंडा यांच्या वतीने विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून परंडा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळे व मिठाईचे वाटप करण्यात आले.
राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे आणि आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला बळ देणारे नेतृत्व म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. रुग्णालयातील विविध वॉर्डमध्ये जाऊन भाजपा पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रुग्णांची भेट घेत त्यांना फळे व मिठाईचे वाटप केले. यावेळी रुग्णांच्या प्रकृतीची विचारपूसही करण्यात आली.
वाढदिवसाचे औचित्य साधून समाजातील गरजू घटकांसोबत आनंद वाटण्याच्या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आल्याचे भाजपा पदाधिकाऱ्यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी जपत नागरिकांच्या सुख-दुःखात सहभागी होणे, सेवाभावी उपक्रम राबविणे आणि समाजहिताच्या कार्याला प्राधान्य देणे, हा पक्षाच्या कार्यपद्धतीचा एक भाग असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी नमूद केले.

या उपक्रमास भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सूर्यवंशी, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, सरचिटणीस धनाजी गायकवाड, विकास कुलकर्णी, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष प्रमोद लिमकर, अनुसूचित जाती मोर्चा जिल्हा चिटणीस यशपाल बनसोडे, अनुसूचित जाती मोर्चा तालुकाध्यक्ष दीपक गायकवाड, ॲड. भालचंद्र औसरे, बाळासाहेब गिरी, दिव्यांग आघाडीचे तानाजी घोडके, वैद्यकीय आघाडीचे डॉ. आनंद मोरे, हनुमंत पाटील, विठ्ठल तिपाले, सारंग घोगरे, सागर पाटील, किरण कवटे, राहुल जगताप, रणजित मिस्कीन, रामदास गुडे, बाळासाहेब गोडगे, सनी अहिरे, धनंजय काळे, गौरव पाटील, संतोष गायकवाड, आकाश मदने, पांडुरंग मुसळे आदी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

तसेच महिला मोर्चा शहराध्यक्षा ज्योतीताई भातलवंडे, जयंत भातलवंडे यांच्यासह रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि इतर मान्यवरांची उपस्थिती होती. या सामाजिक उपक्रमामुळे रुग्णालयातील रुग्णांमध्येही आनंदाचे वातावरण निर्माण झाले.
