छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरास परंड्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

यशश्री अपडेट्स -परंडा | प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियान टप्पा-१ अंतर्गत परंडा येथे आयोजित करण्यात आलेल्या महसूल शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्व. गोपीनाथ मुंडे सभागृहात पार पडलेल्या या शिबिरात विविध शासकीय योजनांची माहिती देण्यात आली तसेच नागरिकांच्या अडचणींचे तत्काळ निराकरण करण्यात आले.

या शिबिराचे उद्घाटन मा. आ. सुजितसिंह ठाकूर व तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार विजयकुमार बाडकर, पुनम पाटील, मिलिंद परळे, तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरामध्ये फेरफार दुरुस्ती, डिजिटल ७/१२, उत्पन्न प्रमाणपत्र, वय प्रमाणपत्र, अधिवास, राष्ट्रीयत्व, अल्पभूधारक, जात प्रमाणपत्र, नॉन क्रिमिलिअर, रहिवासी तसेच जन्म-मृत्यू दाखले आदी विविध ३८८ प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण मा. आ. सुजितसिंह ठाकूर व तहसीलदार निलेश काकडे यांच्या हस्ते करण्यात आले.

महसूल विभागासह विविध शासकीय विभागांचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. नागरिकांना योजनांची माहिती देऊन त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात आले. तसेच परंडा महसूल मंडळ अंतर्गत बळीराजा पांदण रस्त्यांची माहिती संकलित करून पुढील कार्यवाहीसाठी प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

या शिबिराचे सूत्रसंचालन मंडळ अधिकारी दुर्गप्पा पवार यांनी केले तर आभार ग्राम महसूल अधिकारी बालाजी डाबरे यांनी मानले. शिबिरासाठी परंडा मंडळातील सर्व ग्राम महसूल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *