यशस्वी विद्यार्थ्यांचा कल्याणसागर माध्यमिक विद्यालयात सन्मान सोहळा

यशश्री अपडेट्स -(परांडा )कल्याणसागर माध्यमिक विद्यालयाचा दहावीच्या परीक्षेचा ९८.३८ टक्के निकाल लागला आहे. प्रशालेतील २ विद्यार्थ्यांनी गणित विषयात १०० टक्के गुण मिळविले आहेत.

प्रशालेतील प्रांजली हगवणे हिने दहावीच्या परीक्षेत ९८.८० टक्के गुण घेत तालुक्यातून द्वितीय तर शाळेत प्रथम क्रमांक पटकावला आहे. अर्णव पाटील ९७.८०, मधुरा मुळीक ९७, फिजा बागवान

विद्यालयाचा ९८.३८ टक्के निकाल; हगवणे तालुक्यात द्वितीय

९३.६०, समीक्षा भिसे ९१.६०, रोहिणी मुळीक ८९.६०, रोहित गवारे ८९.६०, सानिया नदाफ ८९.२०, श्रद्धा नरुटे ८६.८०, प्रगती गटकूळ ८४.२०, आयुष कोकाटे ८३.८० व तजीम मोमीन हिने ८२.६० टक्के गुण घेत यश मिळविले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेच्या सचिव प्रज्ञा कुलकर्णी, विकास कुलकर्णी, मुख्याध्यापक सुबोधसिंह ठाकूर, उपनगराध्यक्ष समरजितसिंह ठाकूर, मुख्याध्यापक चंद्रकांत पवार, मुख्याध्यापक किरण गरड, शिक्षक मुकुंद भोसले, चंद्रकांत तनपुरे, महादेव नरुटे, अजित गव्हाणे, रोहित रासकर, दादासाहेब सुरवसे यांच्यासह शाळेतील शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!