परंडा:- नव महाराष्ट्राचे शिल्पकार, अथक परिश्रम, कुशल नेतृत्व दूरदृष्टीपू्र्ण विचार आणि जनसेवेच्या प्रती असलेल्या निष्ठेमुळे सतत विकास आणि समृद्धीचे नवे परिमाण स्थापित करणारे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे घेण्यात आलेल्या रक्तदान शिबिरात २०१ रक्तदात्यांनी रक्तदान केले. या रक्तदान शिबिराचा शुभारंभ भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. या पवित्र कार्यात मनापासून सहभाग नोंदवणाऱ्या रक्तदात्यांचे भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी मन:पूर्वक आभार मानले..!
यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, सुखदेव टोंपे, उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, युवा मोर्चा शहराध्यक्ष तथा नगरसेवक अविनाश विधाते, ॲड. संतोष सुर्यवंशी, ॲड. जहीर चौधरी, युवा नेतृत्व सोहम सावंत, जयदेव गोफणे, अनिल पाटील, सारंग घोगरे,सरचिटणीस तानाजी पाटील, धनाजी गायकवाड, शिवाजीराव पाटील, तुकाराम हजारे, साहेबराव पाडुळे, निशिकांत क्षिरसागर, शहाजीआप्पा पाटील, अजित काकडे, प्रमोद लिमकर, विलास खोसरे, डॉ.अमोल गोफणे, जयंत सायकर, मुकुंद चोबे, तुषार नेटके, प्रदीप जाधव, ज्योतीराम गिरवले, सागर पाटील, राहुल जगताप, रवी मांडवे, मुकुंद करळे उपस्थित होते. या कार्यक्रम यशस्वीतेसाठी धनंजय काळे, गौरव पाटील, मनोहर पवार, सिध्दीक हन्नुरे, व्यंकटेश दिक्षित,अमर ठाकूर, शिवम भातलवंडे, तुषार कोळेकर, शुभम ठाकूर, हिमालय वाघमारे, आकाश मदने तसेच श्री भगवंत ब्लड बँक, बार्शी यांचे कर्मचारी यांनीही परिश्रम घेतले.

