यशश्री अपडेट्स -परंडा : शालेय जीवनातील निखळ मैत्री, गुरुजनांप्रती असलेली आदरयुक्त भावना आणि १८ वर्षांनंतर पुन्हा एकदा वर्गातील बाकावर बसल्याचा आनंद… अशा अत्यंत भावूक आणि उत्साही वातावरणात परंडा येथील प्रेरणा हायस्कूलमधील ‘स्नेहबंध २००८ बॅच’ चा गुरुवंदना व स्नेहमेळावा रविवारी (१० मे) संपन्न झाला. जुन्या आठवणींना उजाळा देत विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुजनांचा कृतज्ञतापूर्वक सन्मान केला.
◼️ *आध्यात्मिक अन् शैक्षणिक विचारांची मेजवानी*
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक हनुमंत यादव होते. प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध किर्तनकार व शिवव्याख्याते हभप बालाजी महाराज बोराडे , शिराळा रामेश्वर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश गुंजाळ , प्रा. शरद झोंबाडे व शफीक पटेल यांची उपस्थिती होती.
यावेळी बोलताना हभप बालाजी महाराज बोराडे यांनी मैत्री आणि अध्यात्म यांचा संगम जीवनाला दिशा देतो, असे सांगून गुरू-शिष्याचे महत्त्व पटवून दिले. प्रा. शरद झोंबाडे यांनी विद्यार्थ्यांच्या प्रगतीचे कौतुक केले, तर शफीक पटेल यांनी “विद्यार्थी बदलले तरी शिक्षकांमधील वात्सल्य कधीच बदलत नाही,” असे गौरवोद्गार काढले.
*२१ गुरुजनांचा सन्मान*
ज्यांच्या मार्गदर्शनाखाली ही बॅच घडली, अशा गुरुजनांचा श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. सन्मानित गुरुजनांची नावे खालीलप्रमाणे:
गोविंद जाधव, हनुमंत यादव, शफीक पटेल, शरद झोंबाडे, तुकाराम देशमाने, महादेव मारकड, जीवन सुरवसे, सुधीर यादव, दादासाहेब जगताप, सुरेश गुंजाळ, जालिंदर सरडे, रविंद्र गरड (लिपिक), राजाभाऊ बनसोडे, अशोक कोकणे, देविदास गरड, शिवा थोरबोले, राहुल गरड, श्रीमती उज्ज्वला वनवे, रणजित देशमुख, देशमुख सर आणि मनियार सर.
*रंगतदार स्पर्धा आणि पुरस्कारांचा पाऊस*
स्नेहमेळाव्यात केवळ चर्चाच नाही, तर ‘बॅच २००८’ च्या मित्र-मैत्रिणींसाठी खास स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यात विजेते ठरलेले विद्यार्थी:
◼️सर्वात जास्त ओळखपत्रे : समीर पाटील
◼️सर्वात लांब पट्टा : सागर माने
◼️सर्वात जास्त नाणी जवळ असणे : मनिषा कवटे
◼️सोशल मीडियाशिवाय आलेला : प्रसन्न रणभोर
◼️मोबाईल बॅटरी ९५%+ असणे : अभिजित बनसोडे
◼️’तसाच दिसणारा’ पुरस्कार : प्रसाद शेळके
◼️’सर्वात बदललेला’ मित्र : विकास सुर्यवंशी
◼️वर्गाचा मनोरंजनकर्ता: किर्ती पालके
◼️नेहमी उशिरा येणारा : विशाल कडबने
◼️खेळ पैठणीचा (संगीत खुर्ची) : राजश्री इतापे (पैठणीची मानकरी)
नियोजन आणि परिश्रम
कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवराज शिंदे यांनी केले, तर सूत्रसंचालन आशुतोष बनसोडे यांनी केले. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी आशुतोष बनसोडे, सागर सोनवणे, युवराज शिंदे, विकास सुर्यवंशी, समीर पाटील, सागर माने, स्वप्निल बोकेफोडे, अभिजीत बनसोडे, मोबीन सय्यद, अभिलाष सुर्यवंशी, तन्वीर मुजावर, सलमान शेख, विशाल कडबने, प्रसाद शेळके, योगेश भागडे, गजानन साळुंके, रमेश चोरमोले, प्रसन्न रणभोर, किर्ती पालके, ज्योती यादव, राजश्री इतापे, राजश्री शेळके, ज्योती शिंदे, मनिषा कवटे, वंदना बनसोडे आणि पल्लवी बोबडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
