पंचायत समिती परांडा येथे शिवस्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात संपन्न

यशश्री अपडेट्स | परांडा(प्रतिनिधी)

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त पंचायत समिती परांडा येथे शुक्रवार, दि. ६ जून २०२६ रोजी शिवस्वराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी स्वराज्य गुढी उभारून छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यात आले.

या कार्यक्रमास पंचायत समितीच्या सभापती अर्चना अण्णासाहेब जाधव, गटविकास अधिकारी विजय गायकवाड, गटविकास अधिकारी रवींद्र जाधव, विस्तार कृषी अधिकारी प्रशांत वाटेळ, सहाय्यक लेखा अधिकारी निंबाळकर राजे, भंडारपाल घोडके, बी.एम. श्रीमती कुंभार, उमेश हिंगडे तसेच पंचायत समितीचे इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचा वारसा जपण्याचे आवाहन केले. स्वराज्य, सुशासन आणि लोककल्याणकारी प्रशासनाची प्रेरणा शिवचरित्रातून मिळत असल्याचे यावेळी वक्त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. देशभक्ती व स्वराज्याच्या विचारांनी भारलेल्या वातावरणात हा सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.हॅशटॅग :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *