परंडा नसरापूर (ता. भोर जि. पुणे) येथे ४ वर्षाच्या चिमुकलीवर झालेल्या अत्याचार व निर्घृण हत्येच्या घटनेचे पडसाद परंडा तालुक्यात उमटले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी परंडा शहरातील ब्राह्मण समाज महिला विविध सामाजिक राजकीय क्षेत्रातील नागरिकांनी एकत्र येत तहसीलदारांना निवेदन दिले.
पुणे येथील या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरला असून, परंडा तालुक्यातील ग्रामस्थांनी या नराधमाचा तीव्र शब्दात निषेध केला आहे. यावेळी तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, याप्रकरणाचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी, . तसेच पीडित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सौ राखीताई देशमुख सौ ज्योतीताई भातलवंडे सौ घोगले सौ जोर्शी
ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष समीर कुलकर्णी भाजपचे विकास कुलकर्णी यांनी तिव्र शब्दात भावना व्यक्त केल्या यावेळी आदिसह नागरिक व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
ब्राह्मण महासंघाचे तहसीलदार यांना निवेदन..
