स्वातंत्र्यवीर सावरकर जयंती निमित्त ‘पेशवा युवा मंच’ तर्फे अभिवादन ! 

यशश्री अपडेट्स- परंडा(प्रतिनिधी)

राष्ट्रभक्त, अष्टपैलू साहित्यिक आणि थोर क्रांतिकारक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त ‘पेशवा युवा मंच’च्या वतीने हंसराज स्वामी मठ येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात अभिवादन करण्यात आले.

“स्वातंत्र्य ही काही अशी वस्तू नाही जी कोणी कोणाला दान करावी. ते स्वतःच्या पराक्रमाने मिळवायचे असते आणि रक्ताने टिकवायचे असते,” या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या प्रेरणादायी विचारांचा जागर यावेळी उपस्थितांनी केला. 

यावेळी पेशवा युवा मंचाचे अध्यक्ष अमित जोशी यांच्या नेतृत्वाखाली विविध मान्यवर व कार्यकर्त्यांनी सावरकरांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. कार्यक्रमास आनंद खर्डेकर, जयंत भातलवंडे, अक्षय देशमुख, श्याम कुलकर्णी, गौरव पाटील, अक्षय जोशी, अमोल वांबुरकर, जयंत चैतन्य, प्रमोद वेदपाठक, अनंत केसकर, रवि वैद्य यांच्यासह पेशवा युवा मंचाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि परिसरातील राष्ट्रप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“ने मजसी ने परत मातृभूमीला…” या सावरकरांच्या ओजस्वी काव्यपंक्तींच्या जयघोषात आणि “स्वातंत्र्यवीर सावरकरांचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. उपस्थितांनी सावरकरांच्या विचारांचा वारसा तरुण पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.

सावरकरांचा जाज्वल्य इतिहास, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक प्रबोधनाचा विचार आजच्या युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रभक्तीपर वातावरणात करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *