फायनान्सचे नावाने सर्वसामान्य लोकांना लुटणारी टोळी गजाआड. गुन्हा दाखल होताच दोन आरोपी तात्काळ अटकेत.

यशश्री अपडेट्स :बार्शी(प्रतिनिधी ): दिनांक १४/०६/२६ रोजी दुपारी १२ वाजण्याचे सुमारास सतीश विजयराव हावळे रा दहिफळ ता कळंब जि.धाराशिव यांचे मुलाचे नावे असलेली हिरो पॅशन मोटारसायकल एच २५ बी सी ३८८३ हि घेवुन दहिफळ येथुन बार्शीकडे बीपीच्या गोळया संपल्याने ते आणण्यासाठी तसेच इतर महत्वाच्या कामासाठी जात असताना दरम्यान कुसळंब टोलनाक्याच्या पुढे एम.पी. पेट्रोल पंपाजवळ येरमाळा ते बार्शी जाणा-या रोडवर २ अज्ञात इसमाने मोटारसायकल वरून पाठीमागुन येवुन फिर्यादीस आडवले व त्याच्या ताब्यातील असलेली मोटारसायकलची चावी जबरदस्तीने काढुन घेतली व त्यातील एक इसम फिर्यादीस म्हणाला की, तु चालवित असलेल्या मोटारसायकलवर फायनान्सचे कर्ज आहे. ते आम्ही जप्त करणार आहे. त्यावेळी फिर्यादीने विनंती केली. या गाडीवर कर्ज आहे त्याबाबत मला काही माहिती नाही. त्यावेळी त्या अज्ञात इसमाने तु १२,००० रूपये दे अशी बेकायदेशीर मागणी केल्यामुळे फिर्यादीने त्यांना १०,००० रक्कम फोन पे व रोख दिले. त्याबाबत कोणतेही पावती दिली नाही. त्यावेळी मोटारसायकलची चावी परत घेत असताना फिर्यादीचे बोटातील एक तोळा सोन्याची अंगठी जबरदस्तीने काढुन घेतली. व फिर्यादीस लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ करून दमदाटी केली. अशा प्रकारची फिर्याद आज दिनांक १५/०६/२६ रोजी
बार्शी तालुका पोलीस ठाणे गु.र.नं.१८३/२०२६ बीएनएस १२७ ( ७ ), ३०८ (२ ), ३०९ ( ४ ), ११५ ( २ ), ३५२, ३५१ ( २ ), ३ ( ५ ), प्रमाणे गुन्हा दाखल
झाला आहे.
सदर गुन्हयाचे गांर्भीय लक्षात घेवुन तात्काळ सपोनि महेश माने व पोलीस पथक यांनी सदर गुन्हयाचा तपास करून
आरोपी निष्पण करून त्यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांची नावे १) अनिकेत सुनिल रसाळ व २६ वर्ष, रा तुळजापूर रोड मांगडे चाळे बार्शी २) ओंकार दिपक परदेशी वय २८ वर्ष रा भवानी पेठ बार्शी ता बार्शी सदर आरोपी यांनी श्रीराम फायनान्स तसेच तत्सम फायनान्स कंपनीचे नावे वसुली एजन्ट बनुण अवैध रित्या सर्व सामान्य लोकांना त्रास देवुन त्यांचेकडुन जबरदस्तीने पैसे उकळण्याचे काम करीत होते.

अजुन अशा प्रकारे कोणास फायनान्स कंपनीचे एंजन्टकडुन अवैध रित्या पैसे लुटण्याचा व अशा प्रकारची घटना घडली
असल्यास त्यांनी विनाविलंब बार्शी तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा असे आवाहन प्रभारी अधिकारी सपोनि महेश माने यांनी केले आहे.
सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, सह पोलीस अधीक्षक
अंजना कृष्णा, यांचे मार्गदर्शनाखाली बार्शी तालुका पोलीस ठाणे प्रभारी अधिकरी सहा. पो. नि. महेश माने, पोसई भालेराव, सपोफौ. गवळी पोहेकॉ/उंदरे, खांडेकर,बोबडे, घाडगे, देशमुख, कावळे पोकॉ बचुटे, दासरे, लोंढे चापोकॉ चिटटलवाड यांनी केली आहे…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *