यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी
डॉ. दीपक ओव्हाळ यांना पीएचडी पदवी प्राप्त झाल्याबद्दल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) पक्षाच्या वतीने विशेष सत्कार करण्यात आला. रिपाईच्या पक्ष कार्यालयात आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या हस्ते डॉ. ओव्हाळ यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी डॉ. ओव्हाळ यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचे कौतुक करत त्यांच्या पुढील शैक्षणिक, सामाजिक व व्यावसायिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या. पीएचडी ही केवळ वैयक्तिक उपलब्धी नसून समाजासाठी प्रेरणादायी बाब असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे तालुकाध्यक्ष दादासाहेब सर्वदे, माजी तालुकाध्यक्ष फकीरदादा सुरवसे, प्रा. रणदिल सर, प्रा. डॉ. चंदनशिवे सर, प्रा. धनवे सर, प्रा. सर्वदे सर, अनिल जानराव सर, हरीभाऊ आडाळे, संजीवन भोसले, भारत देंडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. दीपक ओव्हाळ यांच्या यशाबद्दल अभिनंदन करत समाजातील युवकांनी उच्च शिक्षणासाठी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले. कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.

