यशश्री अपडेट्स-धाराशिव | प्रतिनिधी |
सोशल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून एका तरुणीशी ओळख करून तिला लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात धाराशिव येथील अविनाश गडदे याला सोलापूर येथील सत्र न्यायालयाने जामीन मंजुर केला आहे. स्वतःचा घटस्फोट झाला असुन तरुणीला लग्नाचे आमिष दाखवले, तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले, त्यातून ती तरुणी गरोदर झाली त्यानंतर तिला गर्भपात करायला लावला, तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा नोंद करून अटक करण्यात आली होती.
सोलापूर येथील पिडीत तरुणीला 2014 साली शासकीय नौकरी लागली होती, 2021 मध्ये तिची व गडदे याची टिंडर ॲपवर ओळख झाली त्यानंतर ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले त्यावेळी त्याने तो विवाहित आहे पण घटस्फोट झाल्याचे सांगितले. तुझ्याशी लग्न करतो असे खोटे आश्वासन देवून आमिष दाखवले. त्यानंतर शारीरिक संबंध ठेवल्याने ती प्रेग्नेंट झाली. तिला बळजबरी व धमकी देऊन गर्भपात करायला लावला. भारतीय न्याय संहिता कलम 115(2), 351(2),352,356(1) व 69 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ॲड साखरे यांनी न्यायालयाला सांगितले की, दोन सज्ञान व्यक्तींमध्ये दीर्घकाळ परस्पर संमतीने संबंध असतील, तर प्रत्येक प्रकरणात त्याला फसवणुकीचे स्वरूप देणे योग्य ठरत नाही. सज्ञान व्यक्तींना योग्य-अयोग्य याची जाणीव असते आणि दीर्घकालीन प्रेमसंबंध तुटल्यानंतर निर्माण होणाऱ्या वादांकडे कायद्याच्या चौकटीत अत्यंत सावधपणे पाहणे आवश्यक आहे. यासंदर्भातील सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांचे विविध न्यायनिर्णय त्यांनी न्यायालयासमोर सादर केले.
या प्रकरणात ॲड. विशाल साखरे यांना ॲड खालेद खराडी, ॲड मंजुषा साखरे, ॲड महेश लोहार, ॲड शुभम तांबे, ॲड अमित गोळे, ॲड अर्चना कांबळे, ॲड लक्ष्मीकांत कुलकर्णी, ॲड संकेत गोरे, ॲड ओंकार कोरेगावकर, ॲड रोहित लोमटे आणि ॲड प्रथम खोसरे यांनी सहकार्य केले.
