नवनियुक्त न्यायाधीशांचा धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाकडून सत्कार

यशश्री अपडेट्स-धाराशिव | प्रतिनिधी|

धाराशिव जिल्हा व सत्र न्यायालय येथे नवनियुक्त जिल्हा न्यायाधीश-१ तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश मा.एफ.ए.के.एम.ख्वाजा व ५ वे सह दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) मा.श्रीमती एस.व्हि.कुलकर्णी हे बदली होऊन रुजू झाल्याबद्दल,धाराशिव जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या वतीने त्यांचा भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला.

या कार्यक्रमास प्रमुख पाहुण्या म्हणून प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मा.श्रीमती अभिश्री देव उपस्थित होत्या, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड. खंडेराव चौरे होते. या प्रसंगी मा.शंकर ठुबे-जिल्हा न्यायाधीश-3 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश,राजेश खोमणे- जिल्हा न्यायाधीश-4 तथा अतिरिक्त सत्र न्यायाधीश, श्रीमती पी. व्हि.मेढे- मुख्य न्यायदंडाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा.श्रीमती अभिश्री देव यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.त्यानंतर,जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष ॲड.खंडेराव चौरे यांच्या हस्ते प्रमुख जिल्हा न्यायाधीश श्रीमती देव मॅडम यांचा विशेष सत्कार करण्यात आला.तसेच,नव्याने रुजू झालेले जिल्हा न्यायाधीश मा.एफ.ए. के.एम.ख्वाजा आणि दिवाणी न्यायाधीश मा.श्रीमती एस.व्हि. कुलकर्णी यांचा सत्कार जिल्हा विधिज्ञ मंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अध्यक्ष ॲड.खंडेराव चौरे यांनी नवनियुक्त न्यायाधीशांचे स्वागत केले.यानंतर ज्येष्ठ विधीज्ञ रेवन भोसले, नवनियुक्त न्यायाधीश एफ.ए.के.एम.ख्वाजा व श्रीमती एस.व्हि.कुलकर्णी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रमुख जिल्हा न्यायाधीश मा. श्रीमती अभिश्री देव यांनी आपले मार्गदर्शपर मनोगत व्यक्त करून नवनियुक्त न्यायाधीशांना शुभेच्छा दिल्या.

या सोहळ्याचे सूत्रसंचालन जिल्हा विधिज्ञ मंडळाचे सहसचिव ॲड.संजय भोरे यांनी केले,तर आभार प्रदर्शन सचिव ॲड.बाळासाहेब आवड यांनी केले.या कार्यक्रमास जिल्हा विधिज्ञ मंडळाचे उपाध्यक्ष ॲड.सारिका मुंडे पाटील,कोषाध्यक्ष नरेंद्र वाघोलीकर,महिला सहसचिव ॲड.माधवी धोंगडे उंबरे,महिला प्रतिनिधी ॲड.अर्चना नवले यांच्यासह ज्येष्ठ व नवोदित विधिज्ञ,न्यायालयातील अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *