ईट येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी हाती घेतला भगवा; आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त
यशश्री अपडेट्स | भूम
भूम तालुक्यात शिवसेनेने संघटनात्मक ताकद वाढविण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल टाकले असून, ईट तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेससह विविध पक्षांशी संबंधित प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण या विचारधारेने प्रेरित होऊन तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला.
या पक्षप्रवेश सोहळ्यात संभाजी ब्रिगेडचे भूम तालुकाप्रमुख हनुमान नाना हुंबे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे भूम तालुका उपाध्यक्ष तसेच ईट विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन सचिन सुधाकर हुंबे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मयूर हुंबे यांच्यासह अविनाश हुंबे, अतुल जगताप, उमेश हुंबे, महादेव लिमकर, सतीश नवनाथ हुंबे आणि अविष्कार हुंबे यांनी शिवसेनेत अधिकृत प्रवेश केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यावेळी युवराज भाई हुंबे, सुनील बापू भोईटे, अजित दादा पवार, बापूसाहेब खांडेकर, भीमराव माने, बाळासाहेब हाडूळे, आकाश शिंदे, अक्षय शिंदे आणि काकासाहेब भांडवलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नव्याने पक्षात दाखल झालेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे स्वागत करण्यात आले.
भूम तालुक्यात शिवसेनेचे संघटन बळकट होणार!

ईट परिसरातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे भूम तालुक्यात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात मानले जात आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची वाढती साथ आणि नव्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागामुळे आगामी काळात शिवसेनेच्या राजकीय हालचालींना अधिक गती मिळण्याची शक्यता आहे.
नव्या सहकाऱ्यांच्या प्रवेशामुळे पक्षाची ताकद वाढण्यास मदत होईल, असा विश्वास शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. पक्षात प्रवेश केलेल्या सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून त्यांच्या पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
