मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी सक्षम नेतृत्व; सुजितसिंह ठाकूर साहेबांना संधी द्या!”

यशश्री अपडेट्स -धाराशिव प्रतिनिधी :

धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपाचे प्रबळ दावेदार म्हणून मा. आ. सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या नावाचा गांभीर्याने विचार करण्यात यावा, अशी मागणी आता कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांकडून जोर धरू लागली आहे. अभ्यासू, संयमी आणि विकासाभिमुख नेतृत्व म्हणून ओळख असलेल्या ठाकूर साहेबांना विधानमंडळात संधी मिळावी, अशी अपेक्षा सामान्य कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे नेतृत्व म्हणून सुजितसिंह ठाकूर यांच्याकडे पाहिले जाते. विशेषतः शेतीसाठी पाणी, सिंचन प्रकल्प, दुष्काळ निवारण आणि ग्रामीण विकास या विषयांवर त्यांचा अभ्यास आणि पाठपुरावा महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे मराठवाड्याच्या शाश्वत विकासासाठी त्यांना विधान परिषदेत प्रतिनिधित्व मिळावे, अशी भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे.

भाजपाचे वरिष्ठ नेते तथा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठवाड्यातील जनतेचा आवाज म्हणून सुजितसिंह ठाकूर यांना संधी द्यावी, अशी मागणीही कार्यकर्त्यांनी केली आहे.

“मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या  पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे आणि विकासाचा स्पष्ट दृष्टिकोन असलेले नेतृत्व विधानमंडळात आवश्यक आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *