चिंचपूरच्या कार्यकर्त्यांनी घेतले ‘कमळ’ हाती : माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते पक्षप्रवेश; महाविकास आघाडीला राजकीय धक्का
यशश्री अपडेट्स , परंडा :
भूम तालुक्यातील चिंचपूर (ढगे) येथील राजकीय समीकरणे बदलली असून, जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत आणि माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्ष व संघटनांच्या प्रमुख कार्यकत्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. परंडा येथील भाजपा कार्यालयात हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा विद्यमान सदस्य धनंजय सावंत व दत्ता मोहीते यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते नवीन सदस्यांचे पुष्पगुच्छ व पक्षाचे दुपट्टे देऊन स्वागत करण्यात आले.
भाजपमध्ये प्रवेश करणारे प्रमुख कार्यकर्तेः
या सोहळ्यात शिवसेना (उ.बा.ठा.) तालुका प्रमुख सुधीर ढगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिगंबर ढगे, हिरालाल ढगे, शेषराव ढगे, गणेश कावळे, बाबासाहेब अंधारे, शिवसेना (उ.बा.ठा.) माणकेश्वर विभागप्रमुख प्रमोद ढगे, अविनाश ढगे, मधुकर ढगे, अमर हेळकर, तानाजी ढगे, चैतन्य ढगे, सागर ढगे, निलेश ढगे, पुंडलिक ढगे, समाधान ढगे, रामभाऊ ढगे, गणेश ढगे आदींनी भाजपमध्ये अधिकृत प्रवेश केला.
या कार्यक्रमास भाजपाचे पदाधिकारी, स्थानिक कार्यकर्ते आणि चिंचपूर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोठ्या पक्षप्रवेशामुळे भूम-परंडा परिसरात भाजपची ताकद वाढली असून विरोधकांचे धाबे दणाणले आहेत.
विकासाच्या योजनांमुळे विश्वास वाढला सुजितसिंह ठाकूर यावेळी बोलताना सुजितसिंह ठाकूर यांनी सांगितले की, केंद्र व राज्य शासनाच्या जनहिताच्या योजनांमुळे सामान्य नागरिकांचा भाजपावर विश्वास वाढत आहे. ग्रामीण भागातील विकासकामांना गती देण्यासाठी कार्यकत्यांनी संघटित व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
धनंजय सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली या भागात भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत होत असल्याचेही यावेळी अधोरेखित करण्यात आले.

