स्व. गोपीनाथ मुंडे यांना स्मृतिदिनी अभिवादन; भाजपा संपर्क कार्यालयात प्रतिमेचे पूजन

यशश्री अपडेट्स-परंडा(प्रतिनिधी )

दि. ३ जून : जनसामान्यांचे आधारस्तंभ, माजी केंद्रीय मंत्री व लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात त्यांना  अभिवादन करण्यात आले. भाजपा नेते तथा माजी आमदार मा. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते स्व. मुंडे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांच्या कार्याला विनम्र अभिवादन करण्यात आले.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी स्व. गोपीनाथ मुंडे यांनी ग्रामीण भागातील सामान्य नागरिक, शेतकरी, कष्टकरी आणि वंचित घटकांसाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या नेतृत्वाने महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा दिली असून त्यांचे विचार आणि कार्य आजही कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

या कार्यक्रमास भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, परंडा नगर परिषदेचे उपनगराध्यक्ष समरजीतसिंह ठाकूर, शहराध्यक्ष उमाकांत गोरे, तालुका उपाध्यक्ष डॉ. अमोल गोफणे, हरी शिंदे, जयदेव गोफणे, विकास कुलकर्णी, धनाजी गायकवाड, अमोल केमदारणे, ॲड. जहीर चौधरी, साहेबराव पाडुळे, निशिकांत क्षिरसागर, बाळासाहेब गिरी, नागेश गर्जे, नागेश शिंदे, तानाजी घोडके, प्रा. विलास गायकवाड, शिवाजीराव पाटील, श्रीकृष्ण शिंदे, तुषार नेटके, रामदास गुडे, सुजित परदेशी, जयंत सायकर, योगेश डांगे, अभिषेक चोबे, रामेश्वर चोबे, रवीकुमार गरड, शहर सरचिटणीस धनंजय काळे, तुषार कोळेकर, समाधान कोळेकर, सुखदेव इंगळे, संपत्ती भोळे, गणेश होरे यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या शेवटी स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतींना उजाळा देत त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प उपस्थितांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *