यशश्री अपडेट्स-परंडा(प्रतिनिधी)
परंडा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील केमिस्ट व ड्रगिस्ट बांधवांसाठी आयोजित करण्यात आलेला मार्गदर्शन व चर्चासत्र कार्यक्रम परंडा येथील विश्रामगृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमास तालुक्यातील औषध विक्रेते, मेडिकल व्यावसायिक तसेच संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, धाराशिवचे जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे हे होते. यावेळी ऑल इंडिया ऑर्गनायझेशन ऑफ केमिस्ट अँड ड्रगिस्ट तसेच महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष मा. जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली परंडा तालुक्यातील अतिवृष्टीग्रस्त व पूरग्रस्त केमिस्ट बांधवांना आर्थिक मदतीचे वितरण करण्यात आले.
💠 पूरग्रस्तांना आर्थिक मदत
अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या मेडिकल व्यावसायिकांना संघटनेच्या माध्यमातून मदतीचा हात देण्यात आला. त्यामध्ये :
🔹 भगवंत मेडिकल, शिरसाव — ₹२,००,०००/-
🔹 शिवराज मेडिकल, चिंचपूर खुर्द — ₹८५,०००/-
🔹 एम. एस. मेडिकल, ढग पिंपरी — ₹१,१३,०००/-
अशी आर्थिक मदत जाहीर करून संबंधित व्यावसायिकांना दिलासा देण्यात आला.
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष धनाजी आनंदे यांनी, “औषध व्यवसाय हा केवळ व्यापार नसून समाजसेवेचे प्रभावी माध्यम आहे. केमिस्ट बांधवांनी ग्राहकांचा विश्वास जपत व्यवसायात पारदर्शकता राखावी तसेच संघटनात्मक एकजूट कायम ठेवावी,” असे आवाहन केले. कठीण प्रसंगी संघटना आपल्या सदस्यांच्या पाठीशी ठामपणे उभी असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. हा कार्यक्रम उस्मानाबाद जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे जिल्हा प्रतिनिधी असिफ सय्यद व परंडा तालुकाध्यक्ष विकास जगदाळे यांच्या संकल्पनेतून व पुढाकारातून यशस्वीरित्या पार पडला. कार्यक्रमाला जिल्हा संघटनेचे कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण मुंढे, गजानन साळुंके, गणेश टकले यांचीही उपस्थिती होती.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परंडा तालुका व शहर कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले. यावेळी अन्वर शेख, दिपक ठाकूर, सादिक गणेचारी, राजेश ठक्कर, आनंद केसकर, इलियास बागवान, अवेज शेख, विष्णू भिसे, तेजराज गर्दळे, महेश ननवरे, जयराम डाकवले, महेश गाडगे, रियाज हन्नुरे, आरिफ सय्यद, अमित शेरखाने, राष्ट्रपाल, रवी अभय मसके, पिंटू काकळे, यशवंत शिंदे, पाशा साहा बर्फीवाले, दिपक मोरे, रामदास सागळे, नागेश सागळे, केदार चोबे, शाम सांगळे, दिपक वाघ, अभिजित शेक्काणे, सहदेव हिवरे, तुषार बागल, ज्ञानेश्वर भानवसे, अमोल कारले, आकाश पराडे, दत्तात्रय कदम, जोतिराम चोबे व जाफर शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
