परंडा येथील न्यायालयात असुरक्षीत साक्षीदार केंद्राचे उद्घाटन

यशश्री अपडेट्स-परंडाः परंडा येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय येथे असुरक्षीत साक्षीदार केंद्राचे उद्घाटन प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभीश्री देव यांच्या हस्ते शनिवारी (दि.२३) करण्यात आले.

या असुरक्षित साक्षीदार केंद्रामुळे साक्षीदारांना भयमुक्त व विना दबाव साक्ष नोंदविता येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. एफ. ए. एम. ख्वाजा होते. यावेळी परंडा न्यायालयाचे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर ए. ए. शेख, दिवानी न्यायालय कनिष्ठ स्तर डी. जी. जगताप, जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रवीण गाडे, परंडा विधिज्ञ संघाचे कार्याध्यक्ष ॲड. सुहास पाटील, परंडा तहसीलच्या अप्पर तहसीलदार पूनम पाटील, सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता ऐश्वर्या वडगावे, कनिष्ठ अभियंता श्री. सावंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रवीण सिरसाट आदींची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी परंडा विधिज्ञ संघाचे उपाध्यक्ष ॲड. हनुमंत घोगरे व महिला सदस्य बालिका बनसोडे, सचिव

ॲड. अजित महाडिक, ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. दादासाहेब खरसडे, ॲड. आय. डी. शेख, ॲड. एस. आर. काळे, ॲड. नुरोद्दीन चौधरी, ॲड. हनुमंत वाघमोडे, ॲड. संदीप पाटील, ॲड. दत्तात्रय सूर्यवंशी, ॲड. अप्पासाहेब जगताप, ॲड. सतीश माने,ॲड नागनाथ सूर्यवंशी, ॲड. संतोष सूर्यवंशी, ॲड. अनंत राशीनकर, ॲड. विवेक काळे, ॲड. बापू जामदारे, ॲड. अमोल पाटील, ॲड. अजय खरसडे, ॲड. अमोल करळे, ॲड. अभिजित मोरे, ॲड. उमेश चंदनशिवे, ॲड. संदीप शेळके, ॲड. सुनिल शिंदे, श्रीकृष्ण सोनमाळी, ॲड. राहुल वाघमारे, आफताब शहाबर्फीवले,ॲड. महेश चोपडे, किशोर खबाले, ॲड. तानाजी गरड, न्यायालयीन अधीक्षक शहाजी दळवे, सहाय्यक अधीक्षक नेताजी पेठे, मीना पवार यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विधिज्ञ संघाचे कार्याध्यक्ष ॲड. सुहास पाटील, सूत्रसंचालन ॲड. संतोष सूर्यवंशी व व्ही. एम. काळे तर न्यायालयीन अधीक्षक शहाजी दळवे यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *