तुळजापूरमध्ये खळबळ : नगराध्यक्ष विनोद गंगणे यांना जीवे मारण्याची धमकी

यशश्री अपडेट्स-धाराशिव

तुळजापूर नगर परिषदेचे नगराध्यक्ष विनोद उर्फ पिटू गंगणे यांच्यावर हल्ला करण्यात आला आहे. अतिक्रमण मुक्त तीर्थक्षेत्र तुळजापूर मोहीम त्यांनी राबविली होती त्यातून वैजिनाथ सुरवसे याने त्यांना रात्री अडवून गच्ची धरली, हाणामारी करीत हल्ला केला.

अतिक्रमण मुक्त मोहिमेतुन हा वाद झाला असुन अश्या भयाड हल्लामुळे मोहीम थांबणार नसल्याचे गंगणे म्हणाले. यापुर्वी देखील त्यांना अतिक्रमण मुद्यावरून फोनवर जीवे मारण्याची धमकी दिली होती. काही जण रस्त्याच्या कडेला हातगाडी लावुन व्यवसाय करीत आहेत, त्यांच्याकडुन पैसे गोळा करीत आहेत. अतिक्रमण व त्यामागील अर्थकारण मोठे असुन नियमित कारवाई होणे गरजेचे आहे.

तुळजाभवानी मंदीर परिसरात बाल भिक्षुकरी व भीक मागणारे ज्येष्ठ नागरिक यांची संख्या मोठी असुन आगामी काळात त्यांच्या पुनर्वसनाचा मुद्दा हाती घेणार असल्याचे ते म्हणाले. बालभिक्षुकरी व इतरांमुळे बाहेरून येणाऱ्या भाविकांना त्रास होतो, त्यामुळे हे थांबले पाहिजे. काही ज्येष्ठ नागरिक यांना तुळजापूर येथे आणुन सोडले जाते ते इथे भीक मागतात त्यांना वृद्धाश्रमात सोडणार असल्याचे गंगणे म्हणाले.

Leave a Reply

error: Content is protected !!