करंजा येथील महापुरग्रस्त शेतकऱ्यांचा आक्रोश; महापुराच्या नुकसानभरपाईची तातडीची मागणी

यशश्री अपडेट्स-परंडा(प्रतिनिधी) -सप्टेंबर २०२५ मध्ये सीना नदीला आलेल्या महापुरामुळे करंजा येथील खरडून गेलेल्या शेतजमिनीच्या नुकसान भरपाई पंचनाम्यात तलाठी व कृषी सहाय्यक यांनी बोगस लाभार्थीचा समावेश करून खऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय केला आहे. याची सखोल चौकशी करून अनुदाना पासून वंचीत राहीलेल्या शेतकर्याना त्वरीत आर्थीक मदत देण्यात यावी आशी मागणी करंजा येथील शेतकर्यानी तहसीलदार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की की, सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अभूतपूर्व अतिवृष्टीमुळे सिना नदीला महापूर आला होता.या महापुरात परंडा तालुक्यातील कारंजा व परिसरातील शेकडो एकर शेतजमीन खरडून गेली, पिकं वाहून गेली, बांध फुटले, विहिरी गाळाने भरल्या, जनवरे पुरात वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

शासनाच्या संवेदनशील निर्णयानुसार छऊठक / डऊठक्र निकषाप्रमाणे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्यासाठी संबंधित सज्जाचे तलाठी व कषी सहाय्यक यांना संयुक्त पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु समंधीतानी प्रत्यक्षात शेतात जाऊन पंचनामे केले नाहीत. अनेक शेतकऱ्यांची २ ते ५ एकर जमीन १००% खरडून गेली आहे डोळ्यादेखत जमीन नदीपात्र झाली. तरीही तलाठी साहेबांनी नुकसान दिसत नाही असे नाही. उलट ज्या शेतकऱ्यांची म्हणत पंचनाम्यात नोदच घेतली शेतं नदीपासून २ किमी लांब आहेत, ज्यांचं कोणतंच नुकसान नाही, अशा शेतकर्याची नावे राजकीय वशिल्याने व अर्थपूर्ण व्यवहाराने यादीत समाविष्ट केली आहेत.

नियमाप्रमाणे तलाठी व कृषी सहाय्यक, यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन, शेतकऱ्याच्या समक्ष, फोटो-व्हिडीओ काढून, गुगल मॅपिंग करून पंचनामा करणे बंधनकारक आहे. प्रत्यक्षात

अनेक ठिकाणी अधिकारी शेतावर गेलेच नाहीत. कार्यलयात बसून मर्जीतील लोकांची यादी तयार केली आसल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षते खाली तहसीलदार, गट विकास कृषी अधिकारी, तालुका कारंजा सज्जाचे सर्व पंचनाम्यांची अधिकारी यांची समिती नेमून फेरतपासणी करण्यात यावी.

ड्रोन व सॅटेलाईट इमेज पुरावा सप्टेंबर २०२५ पूर्वी व नंतरच्या सेंटेत्यईट इमेज, ड्रोन सर्वेक्षण करून कोणती जमीन खरच खरडली याचा वैज्ञानिक पुरावा घ्यावा, बोगस यादी र्द्द करून फेरपंचनामा ग्रामसभा बोलावून, दवंडी देऊन, सर्व शेतकयांना समक्ष बोलावून, व्हिडीओ शूटिंगसह नव्याने पारदर्शक पंचनामा

करण्यात यावा, दोषी तलाठी व कृषी सहाय्यक यांच्यावर चौकशी करून योग्यती कारवाई करण्यात यावी, खऱ्या लाभार्थी शेतकर्याना फेरपंचनाम्या नंतर १५ दिवसात आर्थीक मदत द्यावी. शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे. त्याच्यावर असा अन्याय झाला तर तो कुणाकडे दाद मागणार? शासनाचे कर्मचारीच शासनाची फसवणूक करत असतील, तर लोकशाही नावालाच उरते. या गंभीर बाबीची तात्काळ दखल घेऊन प्रत्यक्षदर्शी होऊन गावात यावे, शेतकऱ्यांचे अश्रू पहावेत, आणि न्याय दयावा असे निवेदनात म्हटले आहे.

या वेळी शिवसेना तालुका प्रमुख आण्णासाहेब जाधव, उप सभापती परसु गवारे, पंचायत समिती सदस्य नलवडे, तानाजी अमोल कोलते, आशोक गरड, अनिता माने, कल्याण गोरे बाळासाहेब गुटाळ, अशोक गुटाळ, महाविर खरात, मारुती गोरे, जगन्नात काळे, नवनाथ गुटाळ, बाबुराव माने, सुनिल माने, कृष्णा गोरे, आश्रु घोलप, गणेश शिंदे, सुरेखा गुटाळ, संदीप माने, विश्वास गोरे, बंडू इंगळे, लक्ष्मण माने, समर्थ गोरे, मनोज माने यांच्यासह करंजा येथील शेतकरी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *