​अतिवृष्टी व पुरबाधित शाळांना मदतीचा हात;सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र होतय कौतुक ….

​यशश्री अपडेट्स -परंडा ( दि ४ मे )परंडा तालुक्यातील अतिवृष्टी व पूरबाधित क्षेत्रातील शाळांना मदतीचा हात देण्याच्या उद्देशाने,सीमेन्स वर्कर्स युनियन आणि सीमेन्स ऐक्य ट्रस्ट, ठाणे (पूर्व) यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा तालुक्यातील सहा जिल्हा परिषद शाळांना लाखो रुपयांचे शालेय उपयोगी साहित्य व उपकरणांचे नुकतेच वाटप करण्यात आले.
आवार पिंपरी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आवारात हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.​या उपक्रमांतर्गत जिल्हा परिषद शाळा आवार पिंपरी , वागेगव्हाण,कपिलापुरी,देवगाव (खुर्द), देऊळगाव आणि कारंजा या शाळांना गरजेनुसार मुलींसाठी शौचालये,पाईप लाईन,पाण्याची टाकी व स्टँड,शुद्ध पाण्यासाठी वॉटर फिल्टर्स,स्टील टाक्या, इलेक्ट्रिकल इनव्हर्टर,सतरंज्या,सीलिंग फॅन्स,२० लिटरचे वॉटर थर्मास फ्लास्क आणि प्रयोगशाळा साहित्य प्रदान करण्यात आले.
​या वेळी सीमेन्स ऐक्य एज्युकेशन अँड वेल्फेअर ट्रस्टचे अध्यक्ष अशोक राणे, विश्वस्त तथा सीमेन्स क्रेडिट सोसायटीचे सेक्रेटरी मनोज मोहिते,सीमेन्स वर्कर्स युनियनचे छत्रपती संभाजीनगर ब्रँच सेक्रेटरी दत्तू भंडे,माजी कौन्सिल मेंबर प्रकाश जाधव,सीमेन्स हौसिंग सोसायटीचे माजी चेअरमन विजय जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच पंचायत समितीच्या सभापती श्रीमती अर्चना जाधव,शिवसेना तालुकाप्रमुख आण्णासाहेब जाधव,शालेय समिती अध्यक्ष राजकुमार नरुटे,उपाध्यक्ष श्रीमती धनश्री गुडे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या ​कार्यक्रमात बोलताना अशोक राणे व दत्तू भंडे यांनी सांगितले की, “सीमेन्स वर्कर्स युनियन व ऐक्य ट्रस्टच्या वतीने कामगारांच्या मासिक वर्गणीतून हा निधी जमा केला जातो.आजवर भारतभर आणि विशेषतःमहाराष्ट्रातील ग्रामीण भागात अशाच प्रकारे विविध सामाजिक कार्ये राबवण्यात आली आहेत.”​मदत मिळालेल्या सर्व सहा शाळांच्या मुख्याध्यापकांनी शहाजी घावटे आवार पिंपरी,शिवाजी शिंदे वागेगव्हाण,शिवाजी पंडित कपिलापुरी,बाबासाहेब शिंदे देवगाव (खु.),सचिण सूर्यवंशी देऊळगाव आणि आण्णा कोळी कारंजा यांनी संस्थेच्या या कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.तसेच सर्व मुख्याध्यापकांनी सीमेन्स वर्कर्स युनियन व ट्रस्टच्या नावे आभार पत्र देऊन पदाधिकाऱ्यांचा गौरव केला.​उपस्थित पाहुण्यांनी सीमेन्स युनियनचे जनरल सेक्रेटरी गिरीष आष्टेकर,अध्यक्ष मनोज बोडके व सर्व पदाधिकाऱ्यांचे या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल आभार मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शाळांतील शिक्षक वृंद व ग्रामस्थांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *