यशश्री अपडेट्स: परंडा (प्रतिनिधी)
परंडा तालुक्यातील आनाळा येथील जिल्हा परिषद केंद्रीय प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या ३०० विद्यार्थ्यांना २५०० वह्या आणि इतर शालेय साहित्य अशा एकूण १ लाख रुपयांच्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. २७ जून रोजी पार पडलेल्या या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला असून, ग्रामस्थांमधून या उपक्रमाचे मोठे कौतुक होत आहे.
पुणे येथे व्यवसायाच्या निमित्ताने स्थायिक असणारे आनाळा नगरीचे भूमिपुत्र, समाजसेवक ह.भ.प. अनिल शिंदे, आर. एन. मोटर्सचे मालक राहुल शिंदे आणि भूम तालुक्यातील कासारी येथील भूमिपुत्र, उद्योजक व समाजसेवक विक्रम पाटोळे यांच्या वतीने गेल्या नऊ वर्षांपासून हा स्तुत्य उपक्रम अखंडपणे राबवला जात आहे. शालेय साहित्य वाटपानंतर सर्व लहान मुलांना शिंदे व पाटोळे यांच्या वतीने स्नेहभोजनही देण्यात आले. आगामी काळातही ही सेवा अशीच अविरत सुरू ठेवणार असल्याचा संकल्प विक्रम पाटोळे व अनिल शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आनाळा ग्रामपंचायतीचे सरपंच जोतीराम क्षीरसागर उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खालील मान्यवर उपस्थित होते:
- दत्ता पाटील (माजी जि. प. सदस्य)
- संदीपभाऊ तापकीर (उद्योजक, पुणे)
- दादा सरवदे (तालुकाध्यक्ष, आरपीआय, परंडा)
- मुकेश सायकर (युवा उद्योजक)
- सुरज वागंडे (अध्यक्ष, शालिमार उद्योग समूह, करमाळा)
- दादा फराटे (उपसरपंच, आनाळा ग्रामपंचायत)
- हरिदास शिंदे (भाजपा तालुका उपाध्यक्ष)
- रेवन्नाथ शिंदे (अध्यक्ष, शालेय व्यवस्थापन समिती)
- पठाण सर (मुख्याध्यापक, जि. प. शाळा, आनाळा)
यांसोबतच श्रीकांत जाधव, भाऊसाहेब ननवरे, अजित मुळीक, निशिकांत क्षीरसागर, ह.भ.प. ईश्वर इटकर महाराज, एरिया मॅनेजर अबुबकर शेख, पो. हे. कॉ. रमेश क्षीरसागर, पो. हे. कॉ. लक्ष्मण क्षीरसागर पाटील, अथर्व अनिल शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ग्रामस्थांची मोठी उपस्थिती व परिश्रम
या कौतुकास्पद सोहळ्यासाठी गावातील तानाजी अनाळकर, महादेव शिंदे, बालाजी शिंदे, शिवाजी जाधव, तानाजी अंकुश, महिंद्रा शिंदे, जालिंदर शिंदे, संदीप चव्हाण, कानिफनाथ फराटे, पै. बापू शिंदे, ओंकार शिंदे, रामा हिवरे, बबन बैरागी आदी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम:
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी साजिद शेख, केशव पवार, महेश जाधव, शुभम जाधव, जेजेराम गिलबिले, पुंडलिक रिटे, अनिकेत हिवरे, डॉ. राजू शेख, प्रशांत शिंदे, खंडू चाफे, अमोल रिटे, संदीप थोरात, शंभू क्षीरसागर, तानाजी अनाळकर, रवी चौराशिया आणि शाळेतील सर्व शिक्षक बंधू-भगिनींनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन नकाते मॅडम व कुलकर्णी सर यांनी केले.
