शिक्षणसेवेचा गौरव; बिभिषण रोडगे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव

यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी

राष्ट्रीय शिक्षणरत्न पुरस्कार 2026 प्राप्त तसेच श्री शिवछत्रपती शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. बिभिषणजी रोडगे यांचा आज (दि. 16 जून 2026) बावची विद्यालय, परंडा येथे सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.

साकत-पिंपरी (ता. बार्शी) परिसरातील मान्यवरांच्या वतीने आयोजित या सत्कार समारंभात मा. उमेश पाटील यांच्या हस्ते रोडगे यांचा गौरव करण्यात आला. यावेळी प्रा. शिवाजी काशिद, प्रदीप बापू काशिद (अध्यक्ष, तंटामुक्ती समिती, साकत-पिंपरी), बापूसाहेब खबाले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी बिभिषण रोडगे यांनी शिक्षण क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान प्रेरणादायी असल्याचे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले.

कार्यक्रमादरम्यान विद्यालयाचे प्राचार्य नारायण खैरे यांनी शाळेत राबविण्यात येणाऱ्या विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच गुणवत्तावृद्धी उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची माहितीही त्यांनी उपस्थितांना करून दिली.

या प्रसंगी विद्यालयातील शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उत्साहपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमात उपस्थितांनी बिभिषण रोडगे यांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्याबद्दल गौरवोद्गार व्यक्त केले.

Leave a Reply

error: Content is protected !!