भाजपकडून विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा; धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघातून बसवराज पाटील यांना उमेदवारी


यशश्री अपडेट्स :(प्रतिनिधी):

: भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीने महाराष्ट्र विधान परिषद द्वैवार्षिक निवडणूक 2026 तसेच पोटनिवडणुकीसाठी उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय महासचिव व मुख्यालय प्रभारी अरुण सिंह यांच्या स्वाक्षरीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात महाराष्ट्रातील विविध स्थानिक प्राधिकरण मतदारसंघांसाठी उमेदवारांची नावे घोषित करण्यात आली आहेत.
यामध्ये धाराशिव-लातूर-बीड स्थानिक प्राधिकरण मतदारसंघातून बसवराज पाटील यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. या घोषणेमुळे या मतदारसंघातील राजकीय घडामोडींना वेग आला असून निवडणुकीची रंगत वाढली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या उमेदवारांमध्ये वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली येथून अरुण लखानी, भंडारा-गोंदिया येथून अविनाश ब्राह्मणकर, अमरावती येथून प्रवीण पोटे पाटील, सांगली-सातारा येथून धैर्यशील कदम, सोलापूर येथून राजेंद्र राऊत, अहिल्यानगर येथून प्राजक्त तनपुरे, छत्रपती संभाजीनगर-जालना येथून सुहास शिरसाट, नांदेड येथून अमर राजूरकर आणि जळगाव येथून नंदकिशोर महाजन यांना उमेदवारी देण्यात आली आहे.
तसेच नागपूर स्थानिक प्राधिकरण मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी डॉ. राजीव पोतदार यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
धाराशिव-लातूर-बीड मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीकडे संपूर्ण मराठवाड्याचे लक्ष लागले होते. अखेर बसवराज पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याने स्थानिक राजकारणात नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *