डॉ नितीन पडवळ यांची धाराशिव जिल्हा पर्यावरण समितीवर सदस्य म्हणून निवड.

यशश्री अपडेट्स-धाराशिव (प्रतिनिधी):
विद्या विद्या विकास मंडळ पाथरूड संचलित शंकरराव पाटील महाविद्यालय भूम येथील डॉ नितीन पडवळ प्राध्यापक व विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग यांची धाराशिव जिल्हा पर्यावरण समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. डॉ नितीन पडवळ हे शंकराव पाटील महाविद्यालय भूम जिल्हा धाराशिव येथे प्राणशास्त्र विभाग प्रमुख व प्राध्यापक तसेच डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर या विद्यापीठाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून कार्यरत आहेत त्यांची महाराष्ट्र राज्य तथा देशपातळीवर आयोजित केलेल्या विविध सेमिनार कॉन्फरन्स वर्कशॉप अशा विविध ठिकाणी सल्लागार समितीवर सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
त्यांच्या या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. उद्धव बोराडे उपाध्यक्ष प्रा. डी डी बोराडे सचिव श्री मुरलीधर काटे सर सहसचिव डॉ. संतोष शिंदे कोषाध्यक्ष श्री अतुल सुरवसे प्रा. डॉ. तानाजी बोराडे तसेच संस्थेचे सदस्य श्री उत्तम चाचा बोराडे महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. अनुराधा जगदाळे प्रा. किशोर कुमार गव्हाणे सर व शंकरराव पाटील कनिष्ठ वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचारी यांनी निवडीचे अभिनंदन केले.

Leave a Reply

error: Content is protected !!