विधानसभा निवडणुकीतील विजयाचा भाजपाकडून जल्लोष….

धाराशिव : पश्चिम बंगाल आसाम पंडोचेरी या राज्यातील दणदणीत विजयासह राहुरी व बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीच्या विजयाचा जल्लोष धाराशिव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकात करण्यात आला.

येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजपाच्या वतीने फटाके फोडून व पेढे वाटून आनंद व्यक्त करण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

४ मे २०२६ रोजी जाहीर झालेल्या विधानसभा निवडणूक निकालांमध्ये पश्चिम बंगाल, आसाम आणि पंडोचेरी या राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीने ऐतिहासिक विजय मिळवला असून, महाराष्ट्रातील राहुरी आणि बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय संपादन केला आहे. या विजयाचा जल्लोष छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप कार्यकर्त्यांनी पेढे वाटून, फटाके फोडून केला. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकुर, भाजपा प्रदेश उपाध्यक्ष तथाधाराशिव जिल्हा प्रभारी अर्चनाताई पाटील कुलकर्णी यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी चाकूरकर, भाजपा जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!