यशश्री अपडेट्स|परंडा (प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांच्याबद्दल वादग्रस्त आणि अश्लील वक्तव्य केल्याप्रकरणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, या मागणीचे निवेदन भारतीय जनता पक्षाच्या वतीने परंडा तहसीलदारांना देण्यात आले.

निवेदनात नमूद केल्यानुसार, खासदार संजय राऊत हे नेहमीच वादग्रस्त विधाने करून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करतात. त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्याबाबत केलेले विधान हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारे असून, यामुळे लाखो कार्यकर्त्यांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. राऊत यांनी यापूर्वीही माननीय पंतप्रधान, गृहमंत्री व इतर मंत्र्यांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्ये केली असून ते स्वतः गुंडशाही प्रवृत्तीने वागतात आणि घटनात्मक पदांवरील व्यक्तींचा अनादर करतात, असा आरोपही यावेळी करण्यात आला.
आंदोलन व निवेदनावेळी उपस्थित मान्यवर: या प्रसंगी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते:

- तालुकाध्यक्ष: अरविंदबप्पा रगडे
- शहराध्यक्ष: उमाकांत गोरे
- उपनगराध्यक्ष: समरजीतसिंह ठाकूर
- युवा मोर्चा तालुकाध्यक्ष: अजित काकडे
- इतर प्रमुख पदाधिकारी: सुखदेव टोंपे, किरण देशमुख, साहेबराव पाडुळे, तुकाराम हजारे, श्रीराम देवकर, रामदास गुडे, नागेश शिंदे, राहुल वाघमारे, जयंत सायकर, योगेश डांगे, भगवान चव्हाण, गणपत शिंदे, राजेंद्र शिंदे, मनोहर पवार, यशपाल बनसोडे आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
या प्रकरणी प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन संजय राऊत यांच्यावर लवकरात लवकर कायदेशीर व कडक कारवाई करावी, अशी मागणी भाजप कार्यकर्त्यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
