सिना-कोळेगाव धरण परिसरात चोरांचा धुमाकुळ विद्युत मोटारीचे स्टाटर, मेगा, केबल वायरची चोरी

यशश्री अपडेट्स -परंडा –
परंडा तालुक्यातील सिना-कोळेगाव धरण परिसरातील शेतकर्याच्या विद्युत पंपाचे स्टाटर, ऑटो (मेगा) व केबल एकाच रात्री चोरीस गेल्याने रोसा, डोमगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
रोसा येथील शेतकरी औंदूबर गोडगे यांच्यासह इतर शेतकऱ्यांच्या सिना कोळेगाव धरण परिसरात बसवलेले विद्युत पंपाचे दि१६मे रोजी स्टार्टर, ऑटो (मेगा) व केबल वायर चोरी झाल्याची घटना घडली. या प्रकरणी परंडा पोलिस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, आवाटी येथील आरोपी शहाजी कांबळे यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. मिळालेल्या माहितीनुसार औंदूबर गोडगे यांचे स्टार्टर व ऑटो (मेगा) किंमत ७ हजार रुपये, महादेव वाडेकर यांचा स्टार्टर किंमत ४ हजार रुपये, रामलिंग साबळे यांचा ऑटो. (मेगा) किंमत ३हजार रुपये, अच्युत जगताप यांचा ऑटो (मेगा) किंमत ३ हजार रुपये, दत्ता साबळे यांचा स्टार्टर किंमत ४ हजार रुपये असे एकूण सुमारे २१ हजार रुपयांचे साहित्य चोरीस गेले असून इतर शेतकऱ्यांच्या केबल वायरही चोरट्यांनी लंपास केल्याचे समोर आले आहे.
अनोळखी आरोपी यांच्या विरोधात दि. १७ मे रोजी परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून शहाजी कांबळे यास अटक करण्यात आली आहे. तपासा दरम्यान रोसा येथील रणजित नलवडे यांनी स्टार्टर चोरी केल्याची कबुली अटक करण्यात आलेला आरोपी शहाजी कांबळे याने दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या चोरी प्रकरणात आणखी काही आरोपी समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गजानन मुळे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *