यशश्री अपडेट्स -धाराशिव
विधान परिषदेची स्थानिक मतदारसंघ द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. 18 जून रोजी मतदान तर 22 जून रोजी मतमोजणी होणार आहे.धाराशिव-लातूर-बीड यासह 16 मतदार संघाची निवडणुक जाहीर झाली असुन आदर्श आचारसंहिता लागु झाली आहे.
सोलापूर, अहिल्यानगर, ठाणे, जळगाव, सांगली- सातारा, नांदेड, यवतमाळ, पुणे, भंडारा-गोंदिया, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, नाशिक, वर्धा-चंद्रपूर- गडचिरोली, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर- जालना या 16 मतदार संघासाठी निवडणूक होणार आहे.
गेल्या दोन अडीच वर्षांपासून आमदारकीच्या जागा रिक्त आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातील एकूण मतदार संख्येच्या 75 टक्के मतदार संख्या असेल तर विधान परिषदेची निवडणूक घेता येते. विधान परिषदेच्या एकूण 78 सदस्य संख्येपैकी 22 सदस्य स्थानिक स्वराज्य संस्थांद्वारे निवडून जात असतात.
विधानपरिषद निवडणूकीचा कार्यक्रम –
- निवडणुकीची अधिसूचना – 25 मे
- अर्ज भरण्याची शेवटची तारीख – 1 जून
- उमेदवारी अर्जाची छाननी – 2 जून
- अर्ज माघारीची मुदत – 4 जून
- मतदान – 18 जून (स. 8 ते दु. 4)
- मतमोजणी – 22 जून
