यशश्री अपडेट्स लातूर –
देशभरात खळबळ उडवून देणाऱ्या NEET 2026 पेपरफुटी प्रकरणात आतापर्यंतची सर्वात मोठी आणि धक्कादायक मोठी माहिती समोर आली. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या सीबीआयने थेट लातूरमधील नामांकित RCC कोचिंग क्लासचे संचालक प्राध्यापक शिवराज मोटेगावकर यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. सीबीआयच्या या कारवाईमुळे शिक्षण क्षेत्रात आणि वैद्यकीय प्रवेशाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली असून अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
28 अधिकाऱ्यांचे पथक आणि 8 ते 10 तास चौकशी लातूर हे वैद्यकीय शिक्षणाच्या तयारीसाठी लातूर पॅटर्न म्हणून संपूर्ण देशात ओळखले जाते. याच लातूरमधील पेपरफुटीच्या धाग्यादोऱ्यांचा शोध घेण्यासाठी सीबीआयचे तब्बल 28 अधिकाऱ्यांचे जंगी पथक दाखल झालं होतं. या पथकाने शिवराज मोटेगावकर यांची तब्बल 8 ते 10 तास चौकशी केली. या चौकशीदरम्यान समाधानकारक उत्तरे न मिळाल्याने आणि संशयास्पद बाबी आढळल्याने अखेर सीबीआयने मोटेगावकरांना ताब्यात घेतलं.
