परंडा तालुक्यात वादळी वाऱ्याचा तडाखा; नागरिकांचे हाल, मोठे नुकसान

यशश्री अपडेट्स -परंडा

पंचायत समिती परिसरातील झाड कोसळून दोन चारचाकी वाहनांचे मोठे नुकसान 

सोनारी रोड वरती अनके ठिकाणी झाडे कोसळून  रस्त्यावर पडली होती.

परंडा तालुक्यात दि 13 मे रोजी दुपारी सुमारे ३ ते ५:३० दरम्यान परंडा शहरासह तालुक्यातील विविध भागांत अचानक सुटलेल्या जोरदार वादळी वाऱ्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या वादळात परंडा पंचायत समिती परिसरातील एक मोठे झाड उन्मळून पडल्याने त्याखाली उभ्या केलेल्या दोन चारचाकी वाहने दबली गेली.

या घटनेत एका वाहनाच्या काचा फुटून मोठे नुकसान झाले असून दोन्ही वाहनांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. वादळी वाऱ्यामुळे संपूर्ण शहरात धुळीचे साम्राज्य पसरले होते. नागरिकांना काही काळ घराबाहेर पडणे कठीण झाले होते. दरम्यान, तालुक्यातील अनेक ठिकाणी आंब्याच्या बागांचे मोठे नुकसान झाले असून इतर फळबागांनाही याचा फटका बसला आहे.

शहरासह तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे अचानक निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

Leave a Reply

error: Content is protected !!