अचानक लागलेल्या आगीत दीड लाख रुपयांचा फटका

यशश्री अपडेट्स -परंडा (प्रतिनिधी)- गोठ्याला आग लागून कडबा व इतर साहित्य जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील मौजे हिंगणगाव येथे आज सकाळी घडली. या घटनेत सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली.

मिळालेल्या माहितीनुसार मौजे हिंगणगाव येथे आज सोमवार दि. 11 मे रोजी सकाळी नाना भोसले यांच्या शेतातील गोठ्याला आग लागली. थोड्याच वेळात आगीने रौद्र रूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच आजूबाजूला असलेल्या लोकांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केला. अग्निशमन दलाच्या गाडीला बोलावण्यात आले.

अग्नीशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या घटनेत कडबा जळून खाक झाला तसेच एक म्हशीचे रेडकू मृत्युमुखी पडले. सदरील शेतकऱ्याचे सुमारे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली. तरी घडलेल्या घटनेची शासनाने पंचनामा करून शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाची मदत करावी अशी मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *