मतपत्रिकेवर उमेदवारांचे फोटो तरीही सहायकाची मागणी; 29 अर्ज फेटाळले

यशश्री अपडेट्स-धाराशिव -प्रतिनिधी

विधान परिषदेच्या उस्मानाबाद बीड व लातुर या स्थानिक स्वराज मतदार संघासाठी 18 जुनला मतदान होणार असुन 988 पैकी जवळपास 41 मतदारांनी सहायक देण्याची मागणी जिल्हाधिकारी तथा निवडणुक निर्णय अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याकडे केली होती त्यातील 12 जणांचे अर्ज मंजुर करण्यात आले आहेत तर 29 जणांचे अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत.

बीड जिल्ह्यातुन 26 मतदारांनी तर लातुर जिल्ह्यातील 15 मतदारांनी सहायक मिळावा यासाठी अर्ज केले होते त्यातील लातुर व बीड जिल्ह्यातील प्रत्येकी 6 असे 12 जणांची विनंती अर्ज मंजुर करण्यात आले आहेत. 29 जणांचे अर्ज नामंजूर केले आहेत, ते लिहता व वाचता येण्या इतपत साक्षर असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

काही जणांनी शपथ पत्र, मीटिंग प्रोसिडींगवर मराठी इंग्लिश सही केल्याचे तपासणीत स्पष्ट झाले मात्र सहायक मागणी करताना त्यांनी अर्जावर अंगठा करीत ‘अंगठे बहाद्दर’ असल्याचे भासवले मात्र जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या सतर्कतेमुळे त्यांचे तपासणीत बिंग फुटले. निवडणुक प्रक्रियेत या 29 जणांनी जाणीवपूर्वक हेतुत आयोगास खोटी माहिती देऊन दिशाभूल व फसवणूक केली. त्यामुळे त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद करावी अशी मागणी होत आहे. जिल्हाधिकारी काय निर्णय घेतात, चक्क आयोगाची फसवणूक केल्याने गुन्हा नोंद करतात का ? याकडे लक्ष लागले आहे.

विधान परिषद निवडणुकीत मतपत्रिकेवर उमेदवाराचे नाव व पक्ष हे इंग्लिश व मराठीत असते शिवाय त्यांचा फोटो असतो. मतदार निरक्षर, दृष्टीदोष, अंध असेल तर त्याला सहायक देण्याची तरतूद आहे मात्र काही जण त्याचा गैरफायदा घेत असल्याचे समोर आले आहे. लिहता, वाचता येत नसले तरी उमेदवार फोटो असल्याने कोणाला मतदान करायचे हे सहज कळू शकते मात्र तरीही काहींनी सहायक हवा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *