लक्ष्मीकांत ढगे यांना राज्यस्तरीय ‘आदर्श समाजरत्न पुरस्कार’ प्रदान


यशश्री अपडेट्स | भूम प्रतिनिधी
बँकिंग कर्ज सल्ला व सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून हजारो उद्योजकांना विविध बँक कर्जप्रकरणे तसेच शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिल्याबद्दल उद्योजक व समाजसेवक लक्ष्मीकांत ढगे (संस्थापक, शताक्षी लोन सर्व्हिसेस) यांना राज्यस्तरीय ‘आदर्श समाजरत्न पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.
महाराष्ट्र दिनानिमित्त राज्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या गौरवार्थ आयोजित करण्यात आलेला पुरस्कार वितरण सोहळा दि. ७ जून रोजी पुणे येथील भारत इतिहास संशोधक मंडळाच्या राजवाडे हॉलमध्ये उत्साहात संपन्न झाला.
या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून डॉ. श्याम विश्वंभर लोकेरे उपस्थित होते, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सीए डॉ. शंकर धर्मादास अंडोळा होते. यावेळी गोपाळजी खंडेरे, भारतीताई रमेश तर्पे, राष्ट्रपती पदक विजेते पोलीस अधिकारी रतीलाल राजाराम चौधरी, डॉ. मनीषा राजेंद्र ढोकणे, अमान सलीम बागवान, प्रवीणजी माणिकचंदजी भंडारी, डॉ. स्वप्नील माने पाटील, राजेंद्रभाऊ पवार, डॉ. भावना मोरे, संदीप बापू रसाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
धाराशिव जिल्ह्यातील भूम तालुक्यातील चिंचपूर ढगे येथील रहिवासी असलेल्या लक्ष्मीकांत ढगे यांनी शताक्षी लोन सर्व्हिसेसच्या माध्यमातून अनेक उद्योजकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी उल्लेखनीय कार्य केले आहे. शासनाच्या विविध योजनांसह अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ हजारो युवक व उद्योजकांपर्यंत पोहोचविण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे.
त्यांच्या या सामाजिक व उद्योजकीय कार्याची दखल घेत राज्यस्तरीय ‘आदर्श समाजरत्न पुरस्कार’ देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल विविध क्षेत्रांतील मान्यवर, मित्रपरिवार आणि नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *