यशश्री अपडेट्स-धाराशिव(प्रतिनिधी)
धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीसाठी प्रदेश भाजपने जरी काही नेत्यांची नावे केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली असली, तरी आजी आमदार सुजितसिंह ठाकूर हे अत्यंत वजनदार आणि मोठया ताकदीचे नेते आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात आणि जाणकारांमध्ये असा कायस बांधला जात आहे की, देशाचे गृहमंत्री अमित शाह शेवटच्या काही मिनिटांत सर्व गणिते बदलून थेट सुजितसिंह ठाकूर यांच्या नावाची घोषणा करू शकतात.
राज्यात सध्या 17 स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघांमध्ये निवडणुकीचा धुरळा उडाला आहे. अशातच दिल्ली दरबारी महायुतीचे जागा वाटप अंतिम झाल्याची माहिती समोर आली आहे. या मंजूर फॉम्र्युल्यानुसार भाजपकडे १२ जामा, शिदे यांच्या शिवसेनेकडे ३ जागा आणि राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाकडे २ जागा असे स्पष्ट चित्र आहे. भारतीय जनता पाटीच्या प्रदेश नेतृत्वाने राज्यातील आपल्या संभाव्य उमेदवारांची काही नावे पाठवली आहेत, यामध्ये मराठवाडयातील अत्यंत महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या धारासिव बीड लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांमध्ये माजी आमदार भाजपचे ज्येष्ठ नेते सुजितसिंह ठाकूर हेच प्रभावी व कार्यक्षम उमेदवार असल्याची भावना धाराशिव जिल्ह्यासह भूम परंडा वाशी मतदारसंघातील कार्यकत्यांची व सामान्य जेनतेची असल्यामुळे सुजितसिंह ठाकूर यांच्याच नावावर केंद्रीय नेतृत्वाकडून सिकामोर्तब होईल अशी चर्चा आहे.
हा विषय केवळ एका निवडणुकीपुरता मर्यादित नाही, तर मराठवाडा अस्तित्वाशी जोडलेला आहे. काही दशकांपूर्वी जेव्हा मराठवाडयात भाजपची अवस्था अत्यंत बिकट होती, तेव्हा सुजितसिंह ठाकूर यांनी विध्यार्थी चळवळी पासून पक्षाचा झंडा हाती घेतला होता. कांग्रेस-राष्ट्रवादीच्या मनाकाळात भाजपलाही काम करणे अत्यांत जिकिरीचे असताना त्यांनी
केवळ मराठवाडाच नव्हे तर राज्यभर सक्रिय कार्यकत्यांची मोठी फळी निर्माण केली. मन १९९९ मध्ये युतीचे सरकार आले तेव्हा भाजपचे दिवंगत लोकनेते, माजी उपमुख्यमंत्री गोपीनाथजी मुंडे यांच्या समवेत ठाकूर यांनी अख्खा महाराष्ट्र पिंजून काढला होता, मराठवाड्यात ग्रामीण भागातील वाड्या -वस्त्यांवर भाजप वाढवण्यासाठी त्यांनी अतोनात कस्ट घेतले. धाराशिव जिल्हा युवा मोर्चा अध्यक्षपदापासून झालेल्या त्यांचा प्रवास थेट भाजप युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदापर्यंत पोहोचला, त्यानंतर २०१४ मध्ये फडणवीस सरकारच्या काळात त्यांनी प्रदेश सरचिटणीस म्हणून अत्यंत महत्वाची जबाबदारी सांभाळली,
विधान परिषदेचे आमदार असताना विधानपरिषद मध्ये सुजितसिंह ठाकूर यांनी मराठवाडाच्या पाण्याचा प्रश्न, कृषी धोरण, तुळजापूर रेल्वेमार्गाची मंजुरी आणि औद्योगीकरण या विषयांवर केलेली रोखठोक व अभ्यासपूर्ण भाषणे मराठवाडयातील जनता आजही विसरलेली नाही. दिवंगत गोपीनाथ मुंडे यांची ऐतिहासिक संघर्ष यात्रा असो वा उपमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ‘महाजनादेश यात्रा’, या दोन्ही मोठ्या मोहिमांच्या आणि नियोजनाची संपूर्ण जबाबदारी सुजितसिंह ठाकूर यांच्यावरच होती. याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या धाराशिव तुळजापूर संपूर्ण दौराचे नियोजन अनेकदा ठाकूर यांनीच यशस्वी करून दाखवले आहे, त्यांच्या याच कार्याची दखल घेऊन २०१७-१८ मध्ये केंद्रीय नेतृत्वाने यांच्यावर आंध प्रदेश आणि तेलंगणा राज्याचे भाजप निवडणूक प्रचार प्रमुख म्हणून मोठी जबाबदारी सोपवली होती, जिथे त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली.
युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष भाजप प्रदेश सरचिटणीस आणि विधान परिषद आमदार महणून काम करहाना त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भूम, परंडा, वाशी या मतदारसंघातीलतेची असंख्य विकासकामे मार्गी लावली. हा सर्व दांडगा राजकीय आणि सामाजिक अनुभव पाहता आजचे पदाधिकारी, कार्यकते आणि सामान्य जनता एकाच चर्चा करत आहे की, सुजितसिंह ठाकूर जय मोठ्या ताकदीचा नेता आहे. त्यांचे कार्य कर्तृत्व, मजबूत संघटनसेली, विषयांची अभ्यासपूर्ण मांडणी, विविध भाषांवर असलेले प्रभुत्व आणि धारदार खानखाणीत आवाज यामुळे एका माणूस म्हणून सर्वगुणसंपान आणि सक्षम नेतृत्वाला डावलणे पक्षांला परवडणारे नाही, म्हणूनच गृहमंत्री अमित शाह शेवटच्या क्षणी ठाकूर यांच्या नावावर शिकामोर्तब करू शकतात, असा ठाम विश्वास समर्थकांना वाटत आहे.
