खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या प्रयत्नांना यश; पाथरूडमध्ये ई-घंटागाडीचे लोकार्पण उत्साहात

यशश्री अपडेट्स-भूम(प्रतिनिधी):-

धाराशिवचे खासदार ओमप्रकाशराजे निंबाळकर यांच्या पुढाकाराने सीएसआर निधीतून मंजूर झालेल्या ई-गार्बेज कलेक्शन वाहनाचे (घंटागाडी) लोकार्पण आज पाथरूड येथे मान्यवर व ग्रामस्थांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले.

भूम तालुक्यातील पाथरूड गाव झपाट्याने विस्तारत असून ओला व सुका कचरा व्यवस्थापनासाठी घंटागाडीची नितांत आवश्यकता होती. ग्रामस्थांनी ही अडचण खासदार निंबाळकर यांच्या कानावर घालताच त्यांनी तात्काळ सीएसआर निधीतून वाहनाची तरतूद केली. आज या वाहनाच्या लोकार्पणाने पाथरूडकरांची मागणी पूर्ण झाली.
“या ई-घंटागाडीमुळे गावातील ओला व सुका कचरा व्यवस्थापन अधिक सुलभ होईल. गाव स्वच्छ व सुंदर ठेवण्यास मोठा हातभार लागेल,” असे मत उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केले.
“खासदार ओमदादांच्या प्रयत्नाने गावात अनेक महत्त्वाकांक्षी कामे पूर्णत्वास जात आहेत. या ई-वाहनामुळे पाथरूडच्या वैभवात आणखी भर पडेल,” असा विश्वास गावकऱ्यांनी यावेळी बोलून दाखवला.
लोकार्पण सोहळा गावकऱ्यांच्या उपस्थितीत पार पडला. वाहनाची चावी ग्रामपंचायत प्रतिनिधींकडे सुपूर्द करण्यात आली. पर्यावरणपूरक ई-वाहन असल्याने इंधन बचत व ध्वनी प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
ई-घंटागाडीच्या माध्यमातून ‘स्वच्छ पाथरूड, सुंदर पाथरूड’ हा संकल्प अधिक बळकट होईल, अशी अपेक्षा आयोजकांनी व्यक्त केली.

या प्रसंगी ठाकरे सेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉ. चेतन बोराडे, युवा उद्योजक भाऊसाहेब बोराडे, ग्रामपंचायत सदस्य धोंडीबा टिळक, शहाजी आठवले, सेवानिवृत्त अधिकारी इंजि. शिवाजी बोराडे, ग्रामपंचायत अधिकारी महादेव गिरी, ज्येष्ठ नेते बिभीषण तात्या तीकटे, गायनाचार्य चंद्रहार मनगिरे, चेअरमन धनंजय बोराडे, व्हॉइस चेअरमन संदिपान पवार, विठ्ठल खुणे, नारायण तीकटे, अश्रुबा शेळवणे, जयराम गव्हाणे, दत्तात्रय पवार, हरिदास पकाले, नारायण पकाले, गोकुळ ढवारे, बाळासाहेब बोराडे, अरुण चव्हाण, जालिंदर खुणे, बापू मेंढे, दत्तात्रेय पोळ, हनुमंत पोळ, अनिल पोळ, भरत पोळ, विष्णुपंत साठे, अमोल तूप समिंदर, पोपट तूप समिंदर, योगेश बोराडे, सोमनाथ गव्हाणे, तात्यासाहेब भोरे, महादेव पवार, संतोष येडे, गौतम तीकटे, विजय खुणे, प्रकाश बोराडे, लिपिक अशोकराज बोराडे, कर्मचारी नागेश पवार, विलास जाधव, योगेश बोराटे यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *