परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीत अनधिकृत अतिक्रमणांवर २३ मे रोजी कारवाई

यशश्री अपडेट्स (प्रतिनिधी)-परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील अनधिकृत अतिक्रमणांवर अखेर शनिवार, दिनांक २३ मे रोजी सकाळी ९ वाजल्यापासून धडक कारवाई करण्यात येणार आहे. न्यायालयीन आदेशानुसार हे अतिक्रमण काढण्याच्या हालचालींना वेग आला असून, बाजार समिती प्रशासनाने यासाठी पूर्ण तयारी केली आहे.

परंडा कृषी उत्पन्न बाजार आवारातील जमिनीबाबत २०१३पासून समितीच्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. २०१७ मध्ये न्यायालयाने या जमिनीबाबत ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाचे उल्लंघन करून काही नागरिकांनी बाजार समितीच्या मालकीच्या १८ अधिकृत गाळ्यांच्या दर्शनी भागात अनधिकृतपणे बांधकाम करून नवीन गाळे थाटले. हे उच्च न्यायालयातही प्रलंबित आहे. मात्र, उच्च न्यायालयाने प्रकरण माननीय याचिकाकर्त्यांच्या बाजूने कोणताही स्थगिती आदेश
अनधिकृत अतिक्रमने हटवण्यासाठी बाजार समितीचे तगडे नियोजन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मालकी हक्काच्या जागेतील अनधिकृत अतिक्रम हटवते वेळी अनुचित प्रकार घडूनये यासाठी अतिरिक्त पोलीस, अतिक्रमन हटविण्यासाठी दोन पोकलेन, दोन जेसीबी, मटेरीअल वाहातुकीसाठी चार टिपर आसे नियोजन करण्यात आले आसल्याची माहिती बाजार समिती कडून मिळाली आहे. असे बाजार समितीकडून सांगण्यात आले. केवळ उच्च न्यायालयात याचिका प्रलंबित आहे म्हणून अतिक्रमण विरोधी कारवाई थांबवता येत नाही. प्रशासनाने कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशानुसार आपल्या स्तरावर कारवाई करावी, असा लेखी बाजार कायदेशीर सल्ल समितीच्या वकिलांनी दिला आहे. या पार्श्वभूमीवर, बाजार समिती प्रशासनाने शनिवार दि २३ मे रोजी सकाळी ९ वाजेपासून हे सर्व अनधिकृत गाळे आणि बांधकाम जमीनदोस्त करण्याचा निर्णय घेतला आहे. या कारवाईमुळे बाजार समिती परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *