डॉ. जय राजेनिंबाळकर यांच्या हस्ते पक्षप्रवेश; एकनाथ शिंदे आणि खासदार ओमदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त
यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव जिल्ह्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून, भाजपच्या युवती मोर्चाच्या जिल्हा प्रभारी तथा माजी युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस देवकन्या गाडे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे धाराशिवमधील शिवसेनेच्या महिला संघटनात्मक ताकदीत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि लोकप्रिय खासदार ओमदादा यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत या महिला कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. डॉ. जय राजेनिंबाळकर यांच्या हस्ते सर्व महिला कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करण्यात आले.

या पक्षप्रवेश सोहळ्यात मनिषा नन्नवरे, सीमा गायकवाड, अश्विनी यरवडकर, शीतल पेठे, छाया तोडकरी, साळू इंगळे, आकूबाई खंडागले, सोनाली चव्हाण, अस्मिता टाकपारे, शिंदु वाघमारे, साळुबाई शितोळे, संगीता वाघमारे, इंदूबाई वाघमारे, सुनीता वाघमारे, छाया वाघमारे, कांचन वाघमारे, रुपाबाई वाघमारे, कंपाबाई वाघमारे, रुक्मीण वाघमारे, टोळाबाई वाघमारे, उर्मिला वाघमारे, कविता वाघमारे, नंदिनी वाघमारे, मनीषा शिनगारे, नंदूबाई धावरे, माळाबाई धावारे आणि निना वाघमारे यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांचा समावेश होता.
यावेळी सोमनाथ गुरव, अमित उंबरे, राजाभाऊ पवार, ज्ञानदेव करवर, मनीषा वाघमारे, श्वेता दुरुगकर, विश्वजीत पाटील, सह्याद्री राजेनिंबाळकर, वैभव उंबरे आणि ॲड. राज राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

पक्षप्रवेशानंतर शिवसेनेच्या वतीने नव्याने पक्षात सहभागी झालेल्या सर्व महिला भगिनींचे स्वागत करून त्यांना पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या. महिलांचे संघटन अधिक मजबूत करणे, महिलांच्या प्रश्नांना वाचा फोडणे, महिला सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणे तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी सक्रियपणे काम करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
महिलांचा राजकीय सहभाग वाढवणे आणि स्थानिक पातळीवर महिलांचे संघटन उभे करणे हे कोणत्याही पक्षासाठी महत्त्वाचे मानले जाते. त्या पार्श्वभूमीवर देवकन्या गाडे यांच्यासारख्या पदाधिकारी आणि अनेक महिला कार्यकर्त्यांचा शिवसेनेतील प्रवेश धाराशिवच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे.
या पक्षप्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेच्या महिला आघाडीला नवी ऊर्जा मिळणार असून, आगामी काळात पक्ष संघटन विस्तारासाठी महिला कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे चित्र आहे.
