भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णींना विधान परिषदेत पाठवा; भाजप कार्यकर्त्यांची एकमुखी मागणी

यशश्री अपडेट्स धाराशिव (प्रतिनिधी )-

धाराशिव लातुर बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघातून भाजपाकडुन धाराशिव भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता भाऊ कुलकर्णी यांना उमेदवार रुपी संधी द्या अशी मागणी धाराशिव जिल्ह्यातील कार्यकर्त्यांतुन होत आहे. दत्ता कुलकर्णी यांचा जनसंपर्क, पक्ष कार्य व संघटन हे उत्कृष्ट असुन वरिष्ठ सभागृहात निवडून येऊ शकतात शिवाय अनेक प्रश्न मार्गी लागतील असा विश्वासू कार्यकर्ते यांनी व्यक्त केला.

धाराशिव जिल्हा परिषद, नगर परिषद व पंचायत समिती निवडणुकीत जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीने अभूतपूर्व यश मिळवीत सत्ता स्थापन केली. पक्ष संघटन, तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संपर्क, दांडगा अनुभव ह्या त्यांच्या जमेच्या बाजु आहेत. राजकीय क्षेत्रासोबतच त्यांनी सिद्धिविनायक परिवाराच्या माध्यमातून बँकिंग, कारखाना यासह सहकार क्षेत्रात उद्योग व रोजगार निर्मितीचे मोठे काम केले आहे.
स्थानिक राजकारण व आरोप प्रत्यारोपात न अडकता कुलकर्णी यांनी विकासात्मक दृष्टीकोन ठेवून काम केले. संघटनात्मक बांधणी, बूथ पातळीवरील तयारी, तसेच विकासाभिमुख अजेंडा घेऊन भाजपा कार्यकर्ते यांना सक्रीय केले. महायुतीच्या घटक पक्षात समन्व्य ठेवत त्यांनी अनेक विषय व मुद्दे मार्गी लावले. सुजितसिंह ठाकूर, राणाजगजीतसिंह पाटील यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांचा त्यांच्यावर विश्वास आहे.धाराशिव जिल्ह्यातील 17 मंडळांमध्ये एकाच दिवशी तब्बल 1 हजार 20 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली त्यामुळे यश आले. ‘संकल्प ते सिद्धी’ यासह अनेक उपक्रम राबविले. शांत, संयमी व पक्षातील सर्वसमावेशक नेतृत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा प्रदेशम्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा प्रदेश निवडणूक संचलन मराठवाडा समितीत त्यांचा समावेश होता. सहकार आघाडी राज्य सहसंयोजक सह अनेक पदावर काम करीत जबाबदारी सक्षमपणे पार पाडली.

धाराशिव जिल्ह्यातील 17 मंडळांमध्ये एकाच दिवशी तब्बल 1 हजार 20 पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणीत नियुक्ती करण्यात आली त्यामुळे यश आले. ‘संकल्प ते सिद्धी’ यासह अनेक उपक्रम राबविले. शांत, संयमी व पक्षातील सर्वसमावेशक नेतृत्व म्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा प्रदेशम्हणुन त्यांच्याकडे पाहिले जाते. विधानसभा प्रदेश निवडणूक संचलन मराठवाडा समितीत त्यांचा समावेश होता. सहकार आघाडी राज्य सहसंयोजक सह अनेक पदावर काम करीत जबाबदारी सक्षमपणे पार पाडली.

भारतीय जनता पार्टी शी एकनिष्ठ राहून त्यांनी भाजप तसेच महायुतीतील सर्व घटक पक्षांशी समन्वय राखला आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण तसेच विविध पक्षांच्या नेत्यांशी असलेले त्यांचे सुसंवाद आणि जिव्हाळ्याचे संबंध हे त्यांच्या नेतृत्वाचे मोठे बळ मानले जाते.

राजकीय जाण, सहकार क्षेत्रातील अनुभव आणि युवकांमधील प्रचंड लोकप्रियता यामुळे आगामी निवडणुकीत ते महायुतीसाठी प्रभावी चेहरा ठरू शकतात, असा राजकीय विश्लेषकांचा अंदाज आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *