छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर मंडळ विभाग सोनारी ता. परंडा येथे संपन्न.

यशश्री अपडेट्स -परांडा :सोनारी येथील जि.प. शाळा येथे सोनारी मंडळामील छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबीर शुक्रवार दि. 15 मे. 2026 रोजी संपन्न झाले.

सदर शिबीरामध्ये नागरिकांना विविध प्रमाणपत्राचे वाटप करण्यान आले , यामध्ये प्रमाणपत्र, रहिवाशी प्रमाणपत्र, नॉन क्रिमीलेयर प्रमाणपत्र वाटप, डिजीटल सातबाराचे वाटप प्रलबीत फेरफार निकाली काडणे शिधापत्रिका वाटप , आधार अपडेशन, पशुसंवर्धन विद्यागाचे औषध वाटप आशा विविध सुविधांची नागरिकांना उपलधता देऊन एकूण 242 लाथार्थी यांना शिबिराचा लाथ देण्यात आला.

सदर शिबीरास 500 से 600 नागरिक उपस्थित होते. सदर शिबीरात सोनारी मंडळातील एकुण 14 गावाच्या लोकांनी सहभाग नोंदवला. शिबीराचे अध्यक्ष मा. निलेश काकडे तहसीलदार परंडा यांनी भूषविले.
प्रमुख उपस्थितीत डोंजा पंचायत समिती गणाचे सदस्य श्री. मकरंद नाना पाटील,परमेश्वर मांडवे, मा. मिलींद पराळे, तालुका कृषी अधिकारी लांडगे साहेब उपस्थित होते

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन- दुर्गापा पवार मंडळ अधिकारी परंडा यांनी केले तर प्रास्ताविक सोनारी मंडळ अधिकारी श्री. एस. के. शेख यांनी केले
सदर शिबीरास तालुक्यातील विविध विभागाचे कर्मचारी यांनी हजार राहुन त्यांच्या विभागाच्या सेवा-सुविधा उपलब्ध करून दिल्या.शिबीरात सोनारी मंडळातील ग्राम महसूल अधिकरी आतार साहेब, धुमाळ साहेब, वानखडे साहेब, तोडकरी साहेब शिंदे साहेब व सायली शिंदे मॅडम हजार होते व सर्व ग्राम महसुल सेवक उपस्थित होते व तसेच तहसील कार्यालयातील कर्मचारी हजर होते.सदरील कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व उपस्थित मान्यवराचे व नागरिक योचे आभार ग्रा.म.अ. सायली शिंदे यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *