यशश्री अपडेट्स -परंडा :
लातूर येथील श्री केशवराज विद्यालयाचा विद्यार्थी आदित्य अविनाश गरड याने दहावीच्या परीक्षेत 100% गुण मिळवल्याबद्दल कात्राबाद ग्रामस्थांच्या वतीने त्याचा जंगी सत्कार करण्यात आला. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या सोहळ्याने आदित्यच्या यशाचा गौरव केला.
पोलीस दलात कार्यरत असलेले वडील अविनाश गरड यांची शिस्त आणि कुटुंबाची शेतीची पार्श्वभूमी असतानाही आदित्यने हे उत्तुंग यश मिळवले. त्याच्या या यशाने गावाचे नाव संपूर्ण जिल्ह्यात गाजत आहे.
गावातील मान्यवरांच्या हस्ते झाला सत्कार
कार्यक्रमाला माजी सरपंच दादाराव गरड, परसराम कोळी,उपसरपंच गणेश कोकाटे, परंडा विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण गरड, रणजीत गरड, पोलीस पाटील महादेव मोरे, विलास गरड, श्रीराम देवकर, संजय बोराडे, दीपक गरड आणि सुजित शिनगारे हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. सर्वच मान्यवरांनी आदित्यच्या जिद्दीचे कौतुक करत त्याला भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
