यशश्री अपडेट्स|परंडा:- येथील योगीराज मल्टीस्पेशालिटी हॅास्पीटल येथे नवीन अत्याधुनिक 4D सोनोग्राफी मशिनचे लोकार्पण भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी परंडा आणि परिसरातील रुग्णांना विशेषतः गरोदर मातांना येथेच ही सुविधा उपलब्ध करून दिल्याबद्दल आणि त्यांच्या कडील यापूर्वीची वापरात असलेली सोनोग्राफी मशिन धाराशिव येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयास देणगी दाखल दिल्याबद्दल डॅा. श्री. देवदत्त कुलकर्णी आणि त्यांच्या सर्व सहकारी डॅाक्टरांना धन्यवाद देऊन त्यांच्या कडून उत्तम रूग्णसेवा घडो, अशा शुभेच्छा दिल्या.

यावेळी शिवसेना -उबाठाचे जिल्हा प्रमुख रणजीत पाटील, माजी नगराध्यक्ष व नगरसेवक रमेशसिंह परदेशी, नगरसेवक राहुल बनसोडे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक जुबेर मोमीन, बालाजी नेटके, माजी नगरसेवक संजयकुमार बनसोडे, डॅा. नलावडे, उद्योजक अशोक वेताळ, देवानंद टकले, रामचंद्र कुलकर्णी, दीपक गायकवाड, महादेव शिंदे, विविध क्षेत्रातील अनेक मान्यवरांसह योगीराज हॅास्पीटलचे सर्वेसर्वा स्त्रीरोग तज्ञ डॅा. श्री. देवदत्त कुलकर्णी, नेत्ररोग तज्ञ डॅा. सौ. आरती देवदत्त कुलकर्णी तसेच तज्ञ व अनुभवी टीममधील कन्सल्टंट रेडीओलॅाजिस्ट डॅा. श्रीपाद बलवंडे, कन्सल्टंट रेडीओलॅाजिस्ट व सोनोलॅाजिस्ट डॅा. अमित भालके, कन्सल्टंट रेडीओलॅाजिस्ट व सोनोलॅाजिस्ट डॅा. रोहित शिंदे आदी तसेच पत्रकार उपस्थित होते.
अत्याधुनिक अशा सोनोग्राफी मशिनच्या सुविधेमुळे परंडा व ग्रामीण भागातील रुग्णांना आणि गरोदर मातांना यापुढे मोठ्या शहरात जावे लागणार नाही. त्यामुळे रुग्णांचा वेळ व पैसा वाचून तात्काळ उपचार करणे शक्य होणार आहे. या अत्याधुनिक सुविधेमुळे गर्भातील बाळाची वाढ, बाळाच्या अवयवातील सूक्ष्म व्यंग आदी बाबींचे स्पष्ट रंगीत चित्रीकरण करता येणार आहे. त्यामुळे योग्य निदान व उपचार करणे शक्य होईल. तसेच अन्य शहरापेक्षा कमी खर्चात ही सेवा उपलब्ध होणार आहे.
