शेतरस्त्यांच्या समस्यांची नायब तहसीलदारांनी घेतली दखल; परंडा तालुक्यात पाहणी

यशश्री अपडेट्स -परंडाः तहसीलदार निलेश काकडे यांच्या आदेशानुसार नायब तहसीलदार पुजा गोरे यांनी दि.२१ व २२ रोजी जवळा (नि.) महसूल मंडळातील विविध गावांमध्ये शेतरस्त्यांची प्रत्यक्ष पाहणी केली व शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या प्रश्नांवर तातडीने कार्यवाही सुरू केली.

घारगाव, सिरसाव, भांडगाव व जवळा शिवारातील रस्त्यांची यावेळी पाहणी करण्यात आली. या मोहिमे अंतर्गत शेतकऱ्यांना कायमस्वरूपी वादमुक्त शेतरस्ता उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निर्देशानुसार शेतरस्ते मोकळे करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत असून त्याची

प्रभावी अंमलबजावणी परंडा तालुका महसूल विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेमुळे ग्रामस्तरावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी जवळा ( नि.) मंडळाधिकारी स्वामी, ग्राम महसूल अधिकारी सिरसाव, घारगाव व जवळा नि. येथील अधिकारी, परंडा तहसील कार्यालयाचे महसूल सहाय्यक तानाजी भोजणे व महसूल सहाय्यक मोरीलवाड उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *