यशश्री अपडेट्स -धाराशिव :
भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयाकडून ५ मे रोजी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या स्वाक्षरीचे “पक्ष संघटन कार्यासाठी, पक्ष संघटन कार्यविस्तारासाठी” संदर्भातील अधिकृत पत्र जाहीर करण्यात आले. या पत्रानंतर धाराशिव जिल्ह्यातील दोन निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नावाबाबत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रदेशातून प्रसिद्ध झालेल्या यादीमध्ये मराठवाडा विभाग संयोजक पदासाठी “ॲडव्होकेट नितीन काळे” असे नाव नमूद करण्यात आले आहे. मात्र, जिल्ह्यात ॲडव्होकेट म्हणून परिचित असलेले नेते म्हणजे ॲडव्होकेट अनिल काळे असून नितीन काळे हे इंजिनिअर म्हणून ओळखले जातात. त्यामुळे “ॲडव्होकेट नितीन काळे” या उल्लेखामुळे नेमके कोणत्या व्यक्तीचा संदर्भ आहे, याबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
दरम्यान, ॲडव्होकेट अनिल काळे आणि इंजिनिअर नितीन काळे हे दोघेही पक्षाचे निष्ठावान कार्यकर्ते असून त्यांनी संघटन मजबुतीसाठी सातत्याने काम केले आहे. त्यामुळे संबंधित पदासाठी नेमकी नियुक्ती कोणाची आहे, याबाबत स्पष्टता होण्याची कार्यकर्त्यांकडून अपेक्षा व्यक्त होत आहे.
